कार्तिक आर्यन नेहमीच विवाधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता सध्या अभिनेता त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. कार्तिकने ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाला त्याच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक सिनेमा असं म्हटलं आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट भारताचे पहिले पॅराऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी पॅराऑलम्पिकच्या सुवर्णपदावर आपलं नाव कोरलं होतं. १८ मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर सर्वांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये मराठी अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कार्तिक आर्यनबरोबर ऑनस्क्रीन काम करणारी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : Video : “EVM मशिन्स बंद, रांगेत तीन तास झाले”, आदेश बांदेकरांचा संताप; म्हणाले, “हे अत्यंत चुकीचं…”

‘चंदू चॅम्पियन’ मध्ये सुरुवातीला ६० ते ७० च्या दशकातील काळ दाखवण्यात आला आहे. सैन्यात झालेली भरती, त्यानंतर युद्धात लागलेल्या गोळ्या अशा सगळ्या घडामोडी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. परंतु, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मराठी अभिनेत्री हेमांगी कवी झळकली आहे.

हेही वाचा : थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

आईचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठं असतं. प्रत्येक क्षणाला आई आपल्याला साथ देते. अशाचप्रकारे मुरलीकांत पेटकर यांना देखील त्यांच्या आईने खंबीर पाठिंबा दिला होता. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवीने चित्रपटात मुरलीकांत यांच्या आईची भूमिका साकारली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हेमांगीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “१४ जूनला सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहा” असं आवाहन अभिनेत्रीने तिच्या सर्व चाहत्यांना केलं आहे.

हेही वाचा : Video: पहिल्यांदाच दिसला दीपिका पादुकोणचा बेबी बंप; मतदानानंतर गर्दीत पत्नीची काळजी घेताना दिसला रणवीर सिंग

दरम्यान, ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचं दिग्दर्शक कबीर खानने केलं आहे. तसेच कबीर खान यांच्याबरोबर साजिद नाडियाडवालाने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. सुवर्णपदक विजेते पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं. या चित्रपटात कार्तिकबरोबर अभिनेत्री विद्या बालन आणि नॅशनल क्रश तृप्ती डिमरी या झळकणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan chandu champion trailer out now hemangi kavi play this role sva 00