अभिनेता कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कमलनाथ यांना पाठिंबा देताना दिसतो. पण हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे, असं अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे. ओरिजनल व्हिडीओ एका जाहिरातीचा असल्याचं कार्तिकने म्हटलं आहे. तसेच आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे कार्तिकने स्पष्ट केले आहे.

“मी तिच्याइतकी सुंदर नाही पण…”, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी आपली भूमिका, सुधा मूर्तींची इच्छा

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत

कार्तिक आर्यनने डिज्नी प्लस हॉटस्टारची जाहिरात केली होती. ती जाहिरात एडिट करून ती काँग्रेसचा प्रचार करणारी बनवली आहे. मॉर्फ केलेल्या व्हिडीओमध्ये बिलबोर्डवर राजकीय नेत्यांचे फोटो दिसतात. तसेच राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्तिकचे संवादही डब करण्यात आले आहेत. इतर कलाकारांच्या तोंडी असलेल्या संवादातही बदल करण्यात आले आहेत. कार्तिकच्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

काँग्रेसच्या प्रचारासाठी मॉर्फ केलेला व्हिडीओ –

दरम्यान, मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारचा प्रचार करणारी जाहिरात व्हायरल झाल्यानंतर कार्तिक आर्यनने त्याच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर ‘ही खरी जाहिरात, बाकी सगळं बनावटी आहे,’ या कॅप्शनने व्हिडीओ पोस्ट केला आहे.

ओरिजनल व्हिडीओ –

दरम्यान, कार्तिकच्या जवळच्या स्त्रोताने दिलेल्या माहितीनुसार, “सोशल मीडियावर कार्तिक आर्यनच्या जाहिरातीची एक मॉर्फ केलेली आवृत्ती फिरत आहे. ओरिजनल जाहिरात त्याने डिज्नी प्लस हॉटस्टार या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी केली होती. हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. कार्तिकचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.”

Story img Loader