कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिकने चित्रपटासाठी जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन केले, ज्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले. बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक असलेल्या कार्तिकचे फॅन फॉलोइंगही गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहे. या काळात कार्तिकची क्रेझ तरुणांमध्ये वाढली अन् याचेच एक दृश्य शनिवारी मुंबईतील अभिनेत्याच्या घराबाहेर पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिकच्या एका चाहत्याने त्याला त्याच्या घराबाहेर येऊन एक मोठं सरप्राइज दिलं आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातून आलेल्या कार्तिकच्या एका चाहत्याने ११६० किलोमीटर सायकलवर प्रवास करत केवळ कार्तिकला भेटण्यासाठी मुंबई गाठली. कार्तिक आर्यननेही त्याच्या चाहत्याला निराश न करता घराबाहेर पडून तयाची भेट घेतली. यादरम्यान कार्तिकने इतर फॅन्सबरोबर फोटोदेखील काढले. कार्तिकही त्याच्या चाहत्याशी थोडा वेळ बोलला. यादरम्यान त्या तरुणाने सांगितले की, झाशीहून सायकलने मुंबईला पोहोचण्यासाठी त्याला एकूण ९ दिवस लागले.

आणखी वाचा : “ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित

एका चाहत्याने आपल्या प्रेमाखातर इतकी भारावून टाकणारी गोष्ट केल्याचं ऐकून कार्तिकची खूप खुश झाला. त्याने त्याची विचारपुस केली, गप्पा मारल्या. याबरोबरच त्या चाहत्याचे आभारही कार्तिकने मानले. सोशल मीडियावर कार्तिक आणि त्याच्या या अनोख्या चाहत्याचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

कार्तिक आर्यन सध्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कार्तिकने आपल्या शरीरात कमालीचा बदल केला. या ट्रांसफॉर्मेशनसाठी कार्तिकने वर्षभर प्रचंड मेहनत घेतली आहे तसेच त्याने गोड पदार्थांचे सेवनही बंद केले होते. कार्तिकचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan fan travels 1160 km on bicycle from uttar pradesh to meet his star avn