बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव कधी सारा अली खान, तर कधी अनन्या पांडे यांसारख्या अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. पण, दोन-तीन वर्षांपासून तो स्वतःला सिंगल असल्याचे सांगत आहे. मात्र, कार्तिक आर्यनची ‘भूल भुलैया ३’मधील सहअभिनेत्री विद्या बालनने त्याच्या प्रेम प्रकरणाची नुकतीच पोलखोल केली आहे. अलीकडेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एपिसोडमध्ये ‘भूल भुलैया ३’ची टीम सहभागी झाली होती. त्यामध्ये विद्या बालन, कार्तिक आर्यन व तृप्ती डिमरी हे सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच कपिल शर्माच्या एपिसोडचा एक प्रोमो दाखवण्यात आला. त्यामध्ये विद्या बालन कार्तिकच्या प्रेमी जीवनाबद्दलचे एक गुपित उघड करताना दिसली. विद्या म्हणाली की, ‘भूल भुलैया ३’च्या शूटिंगदरम्यान कार्तिकचे कोणाशी तरी प्रेम प्रकरण सुरू होते.

हेही वाचा…‘या’ देशाने ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’च्या प्रदर्शनावर घातली बंदी, कारणं नेमकी काय? वाचा

कार्तिक नेहमीच कोणाशी तरी फोनवर बोलायचा : विद्या बालन

विद्या म्हणाली,”कार्तिक ‘भूल भुलैया ३’च्या शूटिंगदरम्यान नेहमीच फोनवर असायचा आणि त्याच्या संवादांमध्ये नेहमीच ‘लव्ह यू… मी टू’ सुरू असायचे.” प्रोमोमध्ये विद्या कार्तिकला त्या मुलीचे नाव विचारते, त्यावर कार्तिक लाजतो.

सारा, अनन्या व जान्हवीबरोबरही जोडले गेलेय कार्तिकचे नाव

कार्तिक आर्यनचं नाव सारा अली खान, अनन्या पांडे व जान्हवी कपूर यांच्याशी जोडलं गेलंय. परंतु, कार्तिकनं आजवर आपल्या ‘त्या’ नात्याबाबत कधीच उघडपणे वक्तव्य केलेलं नाही. मात्र, ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये सारा आणि अनन्यानं हसत-हसत सांगितलं होतं की, दोघींनी अशा व्यक्तीला डेट केलं आहे, जो सगळ्यांचाच एक्स आहे.

हेही वाचा…सातत्याने येणाऱ्या धमक्यांदरम्यान सलमान खान पोहोचला हैदराबादमध्ये; भाईजान ताज फलकनुमा पॅलेसमध्ये करणार ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण

‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’ची टक्कर

सध्या ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘भूल भुलैया ३’मध्ये कार्तिक आर्यनबरोबर विद्या बालन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा व राजपाल यादव हे मुख्य भूमिकांत आहेत. तर, ‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग व टायगर श्रॉफ असे तारांकित कलाकार आहेत. सलमान खानचा विशेष कॅमिओदेखील या चित्रपटात आहे.

हेही वाचा…‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”

बॉक्स ऑफिस क्लॅशबद्दल कार्तिकचे मत

‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ या क्लॅशबद्दल बोलताना कार्तिकनं ‘इंडिया टुडे’ला सांगितले, “माझ्या मते, दिवाळीत फक्त दोनच नव्हे, तर आणखी काही चित्रपट प्रदर्शित झाले असते तरी चालले असते. मला असे वाटते की, हा प्रेक्षकांसाठी बोनसच आहे. मला अशी अपेक्षा आहे की, दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतील.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan love life exposed by vidya balan on kapil sharma show psg