मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा-मामी मरण पावल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. १३ मे रोजी मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एक होर्डिंग पडले होते. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. त्या मृतांमध्ये कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा देखील समावेश आहे. अपघातानंतर तीन दिवसांनी दोघांचे मृतदेह सापडले.

कार्तिक आर्यनचे मामा मनोज चांसोरिया हे मुंबईतील विमानतळाचे माजी संचालक होते. त्याच्या मामीचं नाव अनिता चांसोरिया होतं. मनोज चांसोरिया यांनी मुंबईच्या एटीसीमध्ये काम केले होते. वर्षभरापूर्वीच निवृत्त झाल्यानंतर ते पत्नीसह जबलपूरला राहायचे. दोघेही कारने मुंबईला आले होते, त्यांचं व्हिसाशी संबंधित काम होतं, असं म्हटलं जातंय. त्यांचा मुलगा यश अमेरिकेला राहतो. त्यामुळे अमेरिकेला जाण्यासाठी ते व्हिसाच्या कामासाठी मुंबईला आले होते. मुंबईहून जबलपूरला परत जात असताना पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले आणि त्याचवेळी होर्डिंग कोसळले.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या

इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले अन् तेवढ्यात होर्डिंग कोसळलं; दाम्पत्याचा मृत्यू

सोमवारी (१३ मे रोजी) दुपारी वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले, तेव्हापासून चांसोरिया यांचा फोन बंद झाला होता. त्यांचा मुलगा अमेरिकेतून फोन करत होता, मात्र काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. मग त्यांच्या मुलाने मुंबईतील मित्रांना याबाबत माहिती दिली आणि चांसोरिया यांचा शोध घेण्याची विनंती केली. मित्रांनीही तात्काळ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत शोध सुरू केला. पोलिसांनी चांसोरिया यांचा फोन ट्रॅक केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर दाखविण्यात आले. त्यांची गाडी आत अडकली होती, त्यामुळे मृतदेह सर्वात शेवटी सापडले.

“प्रियांका चोप्रा आणि मला नेहमीच…”, घटस्फोटानंतर देसी गर्लच्या जाऊबाईचं वक्तव्य; म्हणाली, “जोनास ब्रदर्स…”

मनोज चांसोरियांची गाडी होर्डिंगखाली अडकल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा यश याने अमेरिकेहून मुंबई गाठली. पोलिसांना घटनास्थळी ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह सापडले होते, मात्र तीन दिवस उलटून गेल्याने मृतदेहाची ओळख पटू शकत नव्हती. शेवटी यशने अंगठीवरून आई-वडिलांना ओळखलं आणि गुरुवारीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मामा -मामीच्या अंत्यसंस्काराला कार्तिक आर्यनदेखील गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.