कार्तिक आर्यन त्याच्या कामांमुळे नेहमीच चर्चेत असतो. लोक त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करतात. मात्र, सध्या कार्तिक आर्यन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन सारा अली खानला डेट करत असल्याचं काही म्हटलं जात होतं. मात्र नंतर दोघे वेगळे झाले. यानंतर नुकतंच कार्तिक आर्यनचं नाव बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशनसोबत जोडलं गेलं आहे. कार्तिक आर्यन पश्मिना रोशनला डेट करत असल्याची बातमी आहे. आता या चर्चांवर कार्तिकने मौन सोडलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक आर्यन म्हणाला, “मी एक सेलिब्रिटी असल्याने माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी लोकांसमोर येतील. माझी एखाद्या मुलीशी फक्त मैत्री असली तरी त्याला रिलेशनशिपचं लेबल दिलं जातं. अशा गोष्टी लोकांना बर्याच वेळा त्रास देतात आणि त्यातून समस्याही निर्माण होतात. मात्र, मला आता या सर्व गोष्टींमुळे त्रास होऊ नये यासाठी मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो.”
आणखी वाचा : ब्रँडेड ज्वेलरीपासून ते चॉकलेट्सपर्यंत, ‘कॉफी विथ करण’च्या महागड्या गिफ्ट हॅम्परमध्ये काय असतं? जाणून घ्या
पुढे तो म्हणाला, सोशल मीडियावर माझ्याबद्दल अनेक चांगल्या वाईट गोष्टी बोलल्या जातात. या सगळ्या गोष्टींचा माझ्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होतो. या सगळ्यामुळे जे काही होतं त्याचा मला नक्कीच फरक पडतो. पण मी जर एखादी गोष्ट केली नसेन आणि तरीही त्या गोष्टीवरून माझ्याबद्दल वाईट बोललं जात असेल तर मला नक्कीच दुःख होतं. त्यातल्या अनेक गोष्टी निरर्थक असतात. आता या सगळ्याशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी एक कलाकार आहे आणि कलाकाराला त्याच्या आयुष्यात प्रायव्हसी मिळणं हे फारच कठीण असतं हे मला समजलं आहे.”
हेही वाचा : कार्तिक आर्यनवर प्रेक्षक नाराज, ‘शेहजादा’ चित्रपटाच्या टीझरवर प्रतिक्रिया देत म्हणाले…
दरम्यान कार्तिक आर्यनसाठी २०२२ हे वर्ष खूप खास ठरलं. त्याचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने अनेक रवकॉर्ड्स मोडले. आता कार्तिकच्या आगामी चित्रपटांची यादीही बऱ्यापैकी मोठी आहे. तो ‘हेरा फेरी ३हृतिक रोशनच्या बहिणीला पाहिलेत का? करणार लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण‘ या चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘शेहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ हे त्याचे चित्रपटही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.