‘भुलभुलैय्या ३’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावणारा कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्याबरोबर तो चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला होता. आता मात्र एका मुलाखतीत कार्तिकने त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण

कार्तिक आर्यनने नुकतीच माशाबल इंडिया(Mashable India)ला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्यार का पंचनामा या चित्रपटानंतर काय घडले होते, याची आठवण सांगितली आहे. अभिनेत्याने म्हटले, “मी एका नवीन घरात राहायला गेलो. जिथे मी एकटाच राहत होतो मात्र मी त्या काळात संघर्ष करत होतो. त्यावेळी माझे चित्रपट अयशस्वी होत होते. माझ्याकडे पैसे येत नव्हते.” करिअरच्या सुरूवातीच्या काळात आकाश वाणी, कांची, गेस्ट इन लंडन असे त्याचे चित्रपट फ्लॉफ ठरले होते.

याबद्दल अधिक बोलताना कार्तिक आर्यनने म्हटले, “ज्या घरात मी राहत होतो, त्याचे भाडे द्यायला पैसे नव्हते. त्यावेळी मी खूप संघर्ष करत होतो. पण त्या जागेशी मी जोडला गेलो होतो. अशी एक वेळ आली होती, माझ्याकडे त्या घराच्या भाडे द्यायला पैसे नव्हते. ती एक विचित्र परिस्थिती होती, त्यावेळी मी असा विचार करत असे की, मी कोणीतरी रुममेटस आणतो किंवा दुसरीकडे कोणाबरोबर तरी शेअरिंगमध्ये राहायला सुरूवात करतो. अखेरीस सोनू की टिटू की स्विटी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाने वेगळी ओळख दिली”, अशी आठवण कार्तिकने सांगितली आहे. या चित्रपटाच्या आधी सात वर्षे कार्तिक चित्रपटसृष्टीत काम करत होता.

हेही वाचा: Bigg Boss 18: वाइल्ड कार्ड सदस्यांचं ‘ते’ कृत्य पाहून सलमान खानने लावला डोक्यालाच हात, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

या मुलाखतीत त्याने असेही सांगितले, “या घरात राहायला येण्याआधी मी एका अशा फ्लॅटमध्ये राहायचो, जिथे आम्ही १२ जण होतो. त्यावेळी मी दोन इतके भाडे द्यायचो. त्यानंतर चार हजार द्यायला लागलो.”

दरम्यान, कार्तिक आर्यनने त्याच्या अभिनयाने बॉलीवू़डमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भुलभुलैय्या ३’ च्या एका कार्यक्रमात माधुरी दीक्षितने त्याच्या मेहनत करण्याच्या स्वभावाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. आता चित्रपटगृहात भुलभुलैय्या ३ प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan recalled memory of struggling time says no money to pay rent nsp