‘भूल भुलैय्या’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटात अक्षय कुमारने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर १४ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘भूल भुलैया २’ प्रदर्शित झाला. यात कार्तिक आर्यनने प्रमुख भूमिका साकारली. ‘भूल भुलैय्या २’ हा करोना कालावधी आणि लॉकडाऊननंतर हिट झालेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचा तिसरा भागही येणार आहे असं गेले अनेक दिवस बोललं जात होतं. आता अखेर ‘भूल भुलैय्या ३’चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘भूल भुलैय्या २’ चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘भूल भुलैय्या २’मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेला कार्तिक आर्यनच ‘भूल भुलैय्या ३’मध्ये मुख्य भूमिका साकरताना दिसेल. कार्तिकने या आगामी चित्रपटाचा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो

आणखी वाचा : कार्तिक आर्यन करायचा विना तिकीट ट्रेन प्रवास; ‘त्या’ आठवणींना उजाळा देत म्हणाला होता…

कार्तिक आर्यननं शेअर केलेल्या टीझरची सुरुवात एका हवेलीपासनं होते. जसाजसा टीझर पुढे सरकतो तसं रूह बाबा बनलेल्या कार्तिक आर्यनचा आवाज ऐकू येतो. तो म्हणतो, “काय वाटलं? कहाणी संपली? काही दरवाजे बंदच अशासाठी होतात की एकदिवस पुन्हा त्या दरवाजांना आपण उघडावं.” यानंतर या चित्रपटातील ‘आमी जे तोमार’ हे गाणं वाजायला लागतं आणि रुह बाबाची झलक पहायला मिळते. रुह बाबा म्हणतो, “यावेळी मी आत्म्यांशी फक्त बोलणार नाही, तर आत्मा माझ्या शरीरातही प्रवेश करतील.”

हेही वाचा : कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ पडला ‘पठाण’वर भारी, ‘या’ बाबतीत शाहरुखच्या चित्रपटाला टाकलं मागे

हा टीझर शेअर करत त्याने लिहिलं, “दिवाली २०२४ ला रूह बाबा परत येतोय.” कार्तिकच्या या कॅप्शनवरून स्पष्ट झालं की हा चित्रपट दिवाळी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे ‘भूल भुलैय्या २’ प्रमाणेच या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनीस बज्मी करणार आहेत. आता हा टीझर पाहून या चित्रपटाचे आणि कार्तिकचे नाराज फार उत्सुक झाले आहेत.

Story img Loader