अभिनेता कार्तिक आर्यनने कोणाचाही पाठिंबा नसताना चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली नाही. ‘भूल भुलैया २’, ‘प्यार का पंचनामा’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातून त्याने लोकांचे मनोरंजन केले. आता लवकरच कार्तिक आर्यनचा जागतिक पातळीवर सन्मान करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “दोन नाटकं, मालिकेत काम करून तुम्ही थकत नाही का?”, चाहतीला उत्तर देत निवेदिता सराफ म्हणाल्या, “मनापासून सांगते…”

अभिनेता कार्तिक आर्यनला ‘रायझिंग ग्लोबल सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. व्हिक्टोरिया सरकारच्या हस्ते ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. चित्रपट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्याला प्रदान करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Video : ‘रॉकी और रानी…’ चित्रपटातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा व्हिडीओ व्हायरल, मराठमोळ्या अभिनेत्रीने केली खास कमेंट

कार्तिक आर्यन पुरस्काराबद्दल एका निवेदनाद्वारे आनंद व्यक्त करत म्हणाला, “मेलबर्नच्या १४ व्या भारतीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब असून मी व्हिक्टोरियन सरकारचा आभारी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी हा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.”

हेही वाचा : “एवढा खर्च…”; जेव्हा अनिल कपूर यांच्या कपड्यांचं बिल बघून सलमान खानला बसलेला मोठा धक्का, म्हणालेला…

‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ (IIFM) हा सोहळा ११ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत असणार आहे. हा भारतीय चित्रपट आणि संस्कृतीचा उत्सव असून यामध्ये २० भाषांमधील एकूण १०० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कार्तिकचे ‘भूल भुलैया २’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ हे चित्रपटही या महोत्सवात दाखवले जातील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan to be honoured with the rising global superstar of indian cinema at iffm 2023 sva 00