अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यानच कार्तिकच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची तारीखही जाहीर झाली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकप्रिय दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, कार्तिकच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘चंदू चॅम्पियन’ असून, या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाचा निर्माता आहे. कबीर खान व साजिद नाडियाडवाला या जोडीनं यापूर्वी ’83’ हा चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर आता ही जोडगोळी पुन्हा एकदा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ करत आहे.

हेही वाचा – ‘किसी का भाई किसी की जान’च्या अपयशानंतर सलमान खाननं घेतला मोठा निर्णय; संजय लीला भन्साळींना फोन करत म्हणाला…

कार्तिकच्या या चित्रपटाचं शूटिंग ६ महिन्यांत पूर्ण होणार असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच जून २०२४ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची तयारी केली जात आहे. या चित्रपटात तगडे व्हीएफएक्स दाखवण्यात येणार आहेत. कार्तिकच्या या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कबीर खान व साजिद नाडियाडवाला यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Video: अभिनेते सयाजी शिंदेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “या पक्षाला….”

दरम्यान, कार्तिक आणि कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटानं आतापर्यंत ४२.२१ कोटींची कमाई केली आहे. अवघ्या पाच दिवसांत कार्तिक-कियाराच्या चित्रपटानं ही कमाई केली आहे. यापूर्वी कार्तिक-कियाराच्या ‘भूलभुलैया २’ चित्रपटाचा बोलबाला बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला होता. या चित्रपटानं २५० कोटी रुपयांची कमाई केली होती.