अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘भूल भुलैया ३’ या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. कार्तिक त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे, तसेच सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच कार्तिकने असे काही कृत्य केले की नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. कार्तिक एका अवॉर्ड शोला गेला होता. या शोला छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान आली होती. काही दिवसांपूर्वी हिनाला तिसऱ्या स्टेजचा स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. असं असलं तरी हिनाने तिचं काम थांबवलं नाही. उपचार सुरू असूनही हिना काम करत आहे.

हिना गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आरोग्यामुळे चर्चेत होती. तिची किमोथेरपी सुरू आहे. याच दरम्यान, नुकतीच ती एका अवॉर्ड शोला आली होती. याच अवॉर्ड शोमध्ये कार्तिकने हिनाबरोबर केलेल्या कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Mahima Chaudhry met Hina Khan during her cancer treatment
कर्करोगावर मात करणाऱ्या महिमा चौधरीने हिना खानची घेतली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली….
ankita lokhande nia sharma viral ganpati dance video
Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
actress spruha joshi made modak on the occasion of ganesh festival video viral on social media
गणेशोत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, तिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत म्हणाले…
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती

हेही वाचा…किरण रावचा ‘लापता लेडीज’ सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी नॉमिनेट, आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “भारताचे प्रतिनिधीत्व…”

कार्तिकच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मने

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक एका अवॉर्ड शोमध्ये सर्वात पुढे बसलेला दिसत आहे. तेवढ्यात हिना खान तिथे येते आणि कार्तिक आपल्या जागेवरून उठतो. यानंतर तो हिनाला बसायला आपली जागा देतो, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर हिना पुढे जात करिश्मा कपूरला भेटते.

नेटकऱ्यांनी केलं कार्तिकचं कौतुक

कार्तिकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, “हिना खान आणि कार्तिकबद्दल खूप आदर आहे. हिना खान आजारातून बरे होत असलेल्या आणि उपचार घेत असलेल्या हजारो लोकांना प्रेरणा देत आहे. तर कार्तिकच्या या कृतीतून सर्वांनी शिकायला हवं.” याशिवाय इतर अनेकांनी इमोजी शेअर करून कार्तिकबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं.

हेही वाचा…१.६ कोटींची कमाई करणारा ‘हा’ होता बॉलीवूडचा पहिला सुपरहिट सिनेमा, तुम्ही पाहिलाय का?

हा माझ्या हृदयाचा तुकडा

हिना खानने या अवॉर्ड शोला गुलाबी रंगाचा काश्मीरी सूट परिधान केला होता. त्याचा फोटो शेअर करताना तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, “हा माझ्या हृदयाचा तुकडा आहे. माझ्या आयुष्याच्या या नव्या टप्प्यात मला काश्मीरचं सौंदर्य परिधान करायचं होतं. ही माझ्या जन्मस्थानाशी जोडलेली खास गोष्ट आहे आणि मला हा उत्कृष्ट, सुंदर पारंपरिक काश्मीरी पोशाख घालणे खूप आवडतं.” या सूटवर ‘टिल्ला’ वर्कसह भरतकाम केलं होतं.

हेही वाचा…मुंबईत Coldplay च्या तिसऱ्या शोची घोषणा; प्रचंड प्रतिसादामुळे तिकीट बुकिंग ॲप झाले क्रॅश, करण जोहर पोस्ट करत म्हणाला…

याआधी हिनाने रेड ब्राइडल आउटफिट घालून रॅम्प वॉक केला होता, त्यावेळीही लोकांनी तिची खूप प्रशंसा केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.