अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतंच त्याच्या बहुचर्चित ‘भूल भुलैया ३’ या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे . कार्तिक त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे, तसेच सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच कार्तिकने असे काही कृत्य केले की नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. कार्तिक एका अवॉर्ड शोला गेला होता. या शोला छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान आली होती. काही दिवसांपूर्वी हिनाला तिसऱ्या स्टेजचा स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. असं असलं तरी हिनाने तिचं काम थांबवलं नाही. उपचार सुरू असूनही हिना काम करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिना गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आरोग्यामुळे चर्चेत होती. तिची किमोथेरपी सुरू आहे. याच दरम्यान, नुकतीच ती एका अवॉर्ड शोला आली होती. याच अवॉर्ड शोमध्ये कार्तिकने हिनाबरोबर केलेल्या कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा…किरण रावचा ‘लापता लेडीज’ सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी नॉमिनेट, आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “भारताचे प्रतिनिधीत्व…”

कार्तिकच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मने

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक एका अवॉर्ड शोमध्ये सर्वात पुढे बसलेला दिसत आहे. तेवढ्यात हिना खान तिथे येते आणि कार्तिक आपल्या जागेवरून उठतो. यानंतर तो हिनाला बसायला आपली जागा देतो, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर हिना पुढे जात करिश्मा कपूरला भेटते.

नेटकऱ्यांनी केलं कार्तिकचं कौतुक

कार्तिकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, “हिना खान आणि कार्तिकबद्दल खूप आदर आहे. हिना खान आजारातून बरे होत असलेल्या आणि उपचार घेत असलेल्या हजारो लोकांना प्रेरणा देत आहे. तर कार्तिकच्या या कृतीतून सर्वांनी शिकायला हवं.” याशिवाय इतर अनेकांनी इमोजी शेअर करून कार्तिकबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं.

एका युजरने कार्तिक आर्यन आणि हिना खानचे कौतुक करत व्हायरल व्हिडीओवर कमेंट केली आहे. (Photo Credit – Viral Bhayani video Comment Screenshot)

हेही वाचा…१.६ कोटींची कमाई करणारा ‘हा’ होता बॉलीवूडचा पहिला सुपरहिट सिनेमा, तुम्ही पाहिलाय का?

हा माझ्या हृदयाचा तुकडा

हिना खानने या अवॉर्ड शोला गुलाबी रंगाचा काश्मीरी सूट परिधान केला होता. त्याचा फोटो शेअर करताना तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, “हा माझ्या हृदयाचा तुकडा आहे. माझ्या आयुष्याच्या या नव्या टप्प्यात मला काश्मीरचं सौंदर्य परिधान करायचं होतं. ही माझ्या जन्मस्थानाशी जोडलेली खास गोष्ट आहे आणि मला हा उत्कृष्ट, सुंदर पारंपरिक काश्मीरी पोशाख घालणे खूप आवडतं.” या सूटवर ‘टिल्ला’ वर्कसह भरतकाम केलं होतं.

हेही वाचा…मुंबईत Coldplay च्या तिसऱ्या शोची घोषणा; प्रचंड प्रतिसादामुळे तिकीट बुकिंग ॲप झाले क्रॅश, करण जोहर पोस्ट करत म्हणाला…

याआधी हिनाने रेड ब्राइडल आउटफिट घालून रॅम्प वॉक केला होता, त्यावेळीही लोकांनी तिची खूप प्रशंसा केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan wins hearts by offering his seat to hina khan at award show psg