बॉलिवूडमध्ये रिलेशनशिप आणि ब्रेकअप ही खूपच सामान्य बाब आहे. सेलिब्रेटींमध्ये कधी जवळीक किंवा दुरावा वाढेल हे काही सांगता येत नाही. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री सारा अली खानने खुलेआम कार्तिक आर्यनवर आवडत असल्याची कबुली दिली होती. अनेकदा दोघंही एकत्र दिसले होते. पण नंतर दोघांमध्ये दुरावा वाढला आणि ते वेगळे झाले. सध्या सारा अली खानचं नाव क्रिकेटर शुबमन गिलशी जोडलं जातंय. पण सारा आणि कार्तिकचं ब्रेकअप का झालं? तसेच शुबमन साराच्या आयुष्यात कसा आला याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.
सारा अली खानने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये कार्तिक आर्यन आवडत असल्याचं मान्य करत त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ‘लव आज कल’ चित्रपटाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कार्तिक आणि सारा यांच्यातील जवळीक वाढली. त्यावेळी कार्तिक आणि सारा अनेकदा एकत्र स्पॉट झाले. एकमेकांसह त्यांनी सोशल मीडियावरही फोटो शेअर केले होते.
‘लव्ह आज कल’च्या शूटिंगच्या वेळी सारा आणि कार्तिक यांच्यातील जवळीक आणखी वाढल्याचं दिसून आलं. दोघंही अनेकदा लंच, डिनर डेटवर एकत्र जाताना दिसले होते. अशात दोघांची मैत्री पाहून सर्वांना वाटलं होतं की दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत आणि लवकरच लग्न करण्याचा निर्णयही घेतील. पण जसा हा चित्रपट प्रदर्शित झाला या दोघांमध्ये दुरावा वाढल्याचं दिसू लागलं. त्यांच्या भेटी कमी झाल्या आणि दोघंही आपापल्या कामात व्यग्र राहू लागले. एवढंच नाही तर एकमेकांसह फोटो काढण्यासही नकार देऊ लागले.
आणखी वाचा- Video: शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण होतोय तुफान Viral, कॅमेरा बघताच दोघांनी…
कार्तिक आणि साराचं अशाप्रकारे वेगळं होतं त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटात अनन्या पांडेसह स्क्रीन शेअर करत होता आणि त्यावेळी त्याच्यातील मैत्री साराला पसंत नव्हती. तर दुसरीकडे साराचं करिअरच्या सुरुवातीलाच अशाप्रकारे लव्ह अफेअरमध्ये पडणं तिची आई अमृता सिंगला अजिबात आवडलं नव्हतं त्यामुळे तिने साराला या सगळ्यातून बाहेर राहण्याचा सल्ला दिला होता. अर्थात या सगळ्यावर दोघांनीही स्पष्ट बोलणं टाळलं.
आणखी वाचा- सारा अली खानने सुरक्षारक्षकाला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श? व्हायरल व्हिडीओ चर्चेत
दरम्यान मागच्या काही काळापासून सारा अली खानचं नाव क्रिकेटर शुबमन गिलशी जोडलं जातंय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ऑगस्टमध्ये सारा आणि शुबमन लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसले होते. ज्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. अगदी अलिकडेच काही दिवसांपूर्वी दोघंही एकाच फ्लाइटमधून प्रवास करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.