अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो चाहत्यांबरोबर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. याशिवाय खासगी आयुष्याबद्दल अपडेट्सही तो सोशल मीडिया अकाउंटवरून देत असतो. नुकतीच कार्तिकने एक पोस्ट टाकली. त्यात त्याने आई माला तिवारींना कॅन्सर झाला होता आणि आता त्या त्यातून बऱ्या झाल्याची माहिती दिली आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या आईला कॅन्सरचं निदान झालं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“…तर तुम्हीही दहशतवादी आहात”; ‘द केरला स्टोरी’बद्दल बोलताना कंगना रणौत संतापली, म्हणाली, “देशातील सर्वात…”

कार्तिक आर्यनने शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. कार्तिक आर्यनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये आईला कॅन्सरचं निदान झाल्यानंतरच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. “काही काळापूर्वी या महिन्यात ‘बिग सी’ म्हणजेच कॅन्सरने लपून आत घुसून आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. आम्ही हताश आणि निराश व असहाय होतो. पण माझ्या आईची कधीच हार न मानण्याची वृत्ती आणि इच्छाशक्ती यामुळे आम्ही मोठ्या हिमतीने या परिस्थितीला सामोरे गेलो व त्या अंधारावर विजय मिळवला. कॅन्सरने आम्हाला जे शिकवलं आणि दररोज शिकवत आहे ते म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा कोणतीही मोठी सुपरपॉवर नाही.”

कार्तिक आर्यनच्या या पोस्टवर विकी कौशल, आयुष्मान खुराना, रॉनित रॉय, अनुपम खेर, एकता कपूर, नुपूर सेनॉन, दर्शन कुमार यांनी हार्ट इमोजी कमेंट करत प्रेम व्यक्त केलंय.