काही वर्ष आलिया भट्ट, रणबीर कपूरने एकमेकांना डेट केलं. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलला रणबीर-आलियाचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या दोन महिन्यांमध्येच आपण गरोदर असल्याचं आलियाने सोशल मीडियाद्वारे सांगितलं. रणबीर-आलियासाठी हे वर्ष वैयक्तिकरित्याही लकी ठरलं आहे. आपलं आपल्या नवऱ्यावर असणारं प्रेम ती प्रत्येकवेळी व्यक्त करताना दिसते. आता ती रणबीरसाठी चक्क उपवास करणार आहे.
रणबीर-आलिया यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. प्रेग्नेंसीच्या सातव्या महिन्यामध्ये आलियाने नवऱ्यासाठी उपवास करण्याचं निश्चित केलं आहे. याचं कारणही तितकंच खास आहे.
लग्नानंतरचं आलियाचं पहिलं करवा चौथ आहे. लग्नानंतरचं पहिलं करवा चौथ स्पेशल असावं म्हणून पारंपरिक पद्धतीही आलिया फॉलो करणार आहे. गरोदरपणाच्या सातव्या महिन्यामध्येही ती आपल्या नवऱ्यासाठी उपवास करणार आहे. तसेच करवा चौथनिमित्त कपूर कुटुंबामध्ये सेलिब्रेशन होणार आहे.
त्याचबरोबरीने यंदा कतरिना कैफ-विकी कौशल, अली फजल-रिचा चड्ढा, फरहान अख्तर शिबानी दांडेकर, मौनी रॉय-सूरज नांबियार या सेलिब्रिटी कपलचंही पहिलंच करवा चौथ आहे. बी-टाऊनमधील या सुप्रसिद्ध अभिनेत्री आपल्या नवऱ्यासाठी करवा चौथचा उपवास करणार आहेत.