Kashmera Shah : अपघात किंवा आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेले काही सल्ले फॉलो करावे लागतात. लवकर बरं होण्यासाठी आपण ते फॉलो करतो. जेव्हा शरीरावर काही जखमा असतात तेव्हा त्यावर बँडेज किंवा मग पट्टी बांधली जाते. अशा स्थितीत बाहेर पडल्यावर प्रत्येक व्यक्ती आपल्याला पाहून वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात. बाहेरील व्यक्ती काहीवेळा आपल्याला पाहून हास्यास्पद प्रतिक्रिया देतात, तर काहीवेळा वाईट वाटेल असंही म्हणतात. असंच काहीसं प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाहबरोबर घडलं आहे.

१८ नोव्हेंबर रोजी कश्मीरा शाहचा एक भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ती एका काचेला धडकली होती, त्यामुळे तिच्या नाकाला जखम झाली. जखम जास्त असल्याने कश्मीराच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर आहे. बरं वाटल्यानंतर तिने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या प्रकृतीची अपडेटही दिली होती.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”

हेही वाचा : माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

तीन दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तिच्या नाकाला असलेली जखम अजून पूर्ण बरी न झाल्याने तिने त्यावर एक बँडेज लावलं होतं. व्हिडीओमध्ये तिने याची माहिती देत तिच्या चाहत्यांना काळजी केल्याबद्दल धन्यवादही म्हटलं होतं. त्यानंतर आता कश्मीराने पुन्हा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नाकावर असलेल्या बँडेजमुळे तिला आलेला अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

नाकावर बँडेज असल्याने कोणी माझ्याशी बोलत नाही, असं तिने यात सांगितलं आहे. तसेच तिला आता या बँडेजचा फार कंटाळा आला आहे, असं तिने यात म्हटलं आहे. कश्मीरा यामुळे त्रासली आहे. मात्र, तिने व्हिडीओ शेअर करत विनोदी अंदाजात याची माहिती आणि आलेला अनुभव सांगितला आहे.

नेमकं काय म्हणाली कश्मीरा?

“मी आधी पोस्ट केलेला व्हिडीओ एका डॉक्टरांनी पाहिला आणि त्यांनी मला फोन करून मोठं बँडेज लावण्यास सांगितलं. मला हे बँडेज अजिबात आवडत नाही. मी कोणत्या दुकानात गेले तर कोण माझी मदत करत नाही, कोण मला साधं हॅलोसुद्धा बोलत नाही. त्यांना वाटतं, मला हे बॉक्सिंग मॅचमध्ये लागलं आहे की काय. अरे, पण मी कुठे कुणाशी भांडण करते. मी एकदम शांत स्वभावाची मुलगी आहे, मी कधीच कुणाला काही बोलत नाही”, असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘असा’ शूट झाला ‘ठरलं तर मग’ मालिकेचा बहुप्रतिक्षीत प्रोमो! सायलीने दाखवली झलक; नेटकरी म्हणाले, “जुई मॅम आम्ही खूप…”

कश्मीरा किती शांत आहे हे ती सांगत असताना व्हिडीओमध्ये अचानक हसण्याचा आवाज येत आहे. हसण्याचा आवाज ऐकून, “कृष्णाच्या हसण्याचा आवाज आला का?” असं म्हणते आणि पुढे तिला हे बँडेज अजिबात आवडलेलं नाही असं सांगते. तिच्या या मजेशीर व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनीदेखील हसण्याचे इमोजी पाठवले आहेत. तसेच तिला “लवकर बरी हो”, अशा कमेंटही केल्या आहेत.

Story img Loader