कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. तिने इन्स्टाग्रामवर अपघाताची माहिती दिली होती. कश्मीराने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेला एक फोटो शेअर केला होता. आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या नाकावर जखम दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कश्मीराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले. तसेच तिने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. १८ नोव्हेंबर रोजी कश्मीराचा अपघात झाला होता. आता तिने व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात नाकावरची जखम तिने दाखवली.

हेही वाचा – प्राजक्ता माळीचा देवावर विश्वास आहे का? चाहत्याच्या प्रश्नाचं एका शब्दात दिलं उत्तर, म्हणाली…

रस्त्यावरून चालताना शूट केलेल्या व्हिडीओत कश्मीरा म्हणाली, “आता नाकावर एक लहान पट्टी आहे, मोठी पट्टी काढली आहे. पण आता मी बरी आहे. सर्वांचे आभार. रस्ता ओलांडत आहे, नाहीतर इथेच पडायचे. प्रार्थना केल्यात त्यासाठी सर्वांचे आभार, लव्ह यू.”

कसा झाला कश्मीराचा अपघात?

अभिनेत्री आरती सिंहने वहिनी कश्मीराच्या अपघाताबद्दल माहिती दिली होती. “तिची पोस्ट पाहिल्यानंतर आम्ही सगळे काळजीत पडलो. मी कश्मीराशी बोललेय. ती आता बरी होत आहे. तिच्या नाकाला जखम झाली आहे. एका मॉलमध्ये ती काचेला धडकली, काच फुटली आणि तिच्या नाकाला लागलं. खूप रक्तस्त्राव झाला, पण आता ती सुखरूप आहे,” असं आरती म्हणाली होती.

हेही वाचा – “ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनचा व्हिडीओ; म्हणाली, “स्वतःला कमी…”

कश्मीराने केलेली पोस्ट

“देवा, मला वाचवल्याबद्दल आभार. भयंकर अपघात. काहीतरी मोठं होणार होतं, पण थोडक्यात बचावले. आशा आहे की या जखमांच्या खुणा राहणार नाहीत. रोजचा प्रत्येक क्षण जगा. आज माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे,” असं लिहून कश्मीराने एक फोटो पोस्ट केला होता.

कश्मीरा, तिचा पती कृष्णा अभिषेक व त्यांची दोन्ही मुलं हे सर्वजण लॉस एंजेलिसला सुट्टीवर गेले होते. काही दिवसांपूर्वी कृष्णा व दोन्ही मुलं भारतात परतले, मात्र कश्मीरा तिकडेच थांबली होती. तिथेच तिचा अपघात झाला. कश्मीराची प्रकृती आता बरी आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmera shah shares video after horrifying accident thanks fans for prayers hrc