‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने विवेक अग्निहोत्री हे नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. इस्रायलच्या दिग्दर्शकाने या चित्रपटावर टीका केल्याने विवेक अग्निहोत्री चांगलेच संतापले आहेत. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ते रोजच आपल्या टीकाकारांचा समाचार घेत असतात. नुकतीच त्यांनी एक तिरकस पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक अग्निहोत्री यांनी नुकतेच मुंबईत एक आलिशान घर विकत घेतले आहे. त्याची किंमत १७.९२ कोटी इतकी आहे. यावरूनच त्यांनी पोस्ट शेअर केली आहे ते आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतात की, “मी काँग्रेसी, आपियास आणि बेरोजगार बॉलिवूडकरांचा आभारी आहे कारण माझ्यासाठी ते रोज नवनवीन इमारती बांधत आहेत त्याच्या जोडीला महागडे असे फर्निचरदेखील आहे. १० जनपथ वरून आलेला सोफा खूप आवडला. सर्वांचे आभार.” एका व्यक्तीने त्यांच्या आलिशान घरावर टीका केली आहे त्यावरून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटावर काम करत आहेत. तसेच त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटावर ते काम करत आहेत त्या संदर्भातील फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmir files director vivek agnihotri sarcastic tweet on congress aap and bollywood spg