Govinda Health Update: अभिनेता गोविंदाला त्याच्या मुंबईतील घरी परवाना असलेल्या बंदुकीतून पायाला गोळी लागली. आज (१ ऑक्टोबरला) पहाटे ही घटना घडली. यानंतर जखमी गोविंदाला क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या पायातील गोळी काढण्यात आली असून उपचार सुरू आहेत. गोविंदाच्या भेटीसाठी त्याचा भाचा अभिनेता कृष्णा अभिषेकची बायको कश्मीरा शाह पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोविंदा व कृष्णा अभिषेक यांच्यात काही कौटुंबिक वाद आहेत, त्यामुळे ते बोलत नाहीत. मात्र या सगळ्या गोष्टी विसरून कश्मीरा गोविंदाच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचली आहे, तिचा रुग्णालयात जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कश्मीरा भेटीसाठी गेली, पण तिने प्रतिक्रिया देणं टाळलं. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक भारतात नाही. तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे, असं त्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

हेही वाचा – गोळी लागल्यावर गोविंदाची पहिली प्रतिक्रिया; डॉक्टरांचे आभार मानत म्हणाला…

गोविंदाच्या भावाची प्रतिक्रिया

गोविंदाचे भाऊ किर्ती कुमारही त्याच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. गोविंदाच्या पायाच्या अंगठ्याला गोळी लागली आहे, असं त्यांनी सांगितलं. गोविंदा बाहेर जाणार होता, त्याआधी तो बंदूक चेक करत होता, पण ती त्याच्या हातातून खाली पडली आणि त्यातून गोळी सुटली ती त्याच्या पायाला लागली. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्याच्या चाहत्यांचे, त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी आभार मानतो, असं ते म्हणाले.

गोविंदाची प्रतिक्रिया

“नमस्कार, मी गोविंदा.. तुम्हा सर्वांच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. मला पायाला गोळी लागली होती, पण ती काढण्यात आली आहे. मी येथील डॉक्टरांचे आभार मानतो. प्रार्थनासाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद,” अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती

नेमकं काय घडलं?

गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपली परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो सध्या रुग्णालयात आहे, अशी माहिती त्याचा मॅनेजर शशी सिन्हाने दिली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmira shah met govinda misfire gunshot health updates hrc