कतरिना कैफ सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ती सिद्धांत चतुरवेदि, आणि इशान खट्टर हे तिघे सध्या त्यांच्या आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. कतरिना लग्नानंतर प्रथमच पडद्यावर झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहे. याबरोबरच कतरिना आणि विकी यांच्या वैवाहिक जीवनाविषयीही प्रचंड चर्चा सुरू आहे.

कतरिना जरी एका हॉरर चित्रपटात काम करत असली तरी तिला भुताच्या चित्रपटांची सवय अजिबात नाही हे तिने नुकतंच स्पष्ट केलं आहे. ‘पिंकव्हीला’च्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या भुताच्या चित्रपटांचा अनुभव शेअर केला आहे. याविषयी बोलताना कतरिनाने स्पष्ट केलं की तिला हॉरर चित्रपटांची प्रचंड भीती वाटते आणि त्यामुळेच तिला ‘भूलभुलैया २’ हा चित्रपटही तिला पूर्ण बघता आला नाही.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्यावर बायोपिक बनवण्यासाठी दिग्दर्शक आर. बाल्की इच्छुक, पण ही आहे मोठी अडचण

तिला माहीत होतं की या चित्रपटात विनोद आहे, तरीही तिला याची प्रचंड भीती वाटत होती. खासकरून तब्बूला पाहून कतरिनाची चांगलीच घाबरगुंडी उडत होती. शिवाय या मुलाखतीमध्ये कतरिनाने कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला आवडेल याचंही उत्तर दिलं. कतरिनाचे आवडते दिग्दर्शक श्रीराम राघवन आहेत, आणि त्यांच्याबरोबर काम करण्यास कतरिना प्रचंड उत्सुक आहे.

नुकतंच कतरिनाने ‘टायगर ३’ साठी चित्रीकरण पूर्ण केलं असून, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीबरोबरही एका चित्रपटासाठी काम केलं आहे. हा अनुभव फारच अविस्मरणीय असल्याचं कतरिनाने स्पष्ट केलं आहे. शिवाय कतरिना शाहरुखच्या एका चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कतरिनाचा ‘फोन भूत’ हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader