आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या दोघी एकेकाळी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या, परंतु अभिनेता रणबीर कपूरमुळे या दोघींच्या मैत्रीत दुरावा आला. रणबीर-आलियाने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली तेव्हा कतरिना कैफ काहीशी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दोघींचे लग्न झाल्यावर हा अबोला काही प्रमाणात कमी झाला आणि आता दोघींमध्येही आधीसारखी घट्ट मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर आलिया-कतरिनासह विकी कौशलचे एअरपोर्टवरील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : “भेदभावानंतरही तक्रार केली नाही, कारण…”बॉलीवूडमधील घराणेशाहीवर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मांडले परखड मत

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

पापाराझींनी गुरुवारी विकी कौशल, कतरिना कैफ आणि आलिया भट्टला एकत्र एअरपोर्टवर पाहिले. आलिया भट्ट ब्राझीलमध्ये होणाऱ्या नेटफ्लिक्सच्या ‘टुडुम २०२३’ या कार्यक्रमासाठी निघाली होती. या फेस्टिव्हलमध्ये आलिया भट्टचा पहिल्या हॉलीवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर दाखवण्यात येणार आहे. दुसरीकडे, ‘जरा हटके जरा बचके’ रिलीज झाल्यानंतर आता विकी कौशल कतरिना कैफबरोबर बाहेरगावी जाण्यास निघाला होता. याचवेळी एअरपोर्टवर या तिघांची भेट झाली.

हेही वाचा : Video : ‘टायगर ३’मध्ये सलमान खान करणार जबरदस्त स्टंट; प्रदर्शनापूर्वी सेटवरील ‘तो’ व्हिडीओ लीक

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भय्यानी’ याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आलिया आणि विकी-कतरिना विमानतळाच्या फर्स्ट क्लास लाउंजमध्ये फ्लाइटची वाट पाहताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “तुला लाज नाही वाटली?”, तमन्ना भाटियाचा बोल्ड सीनचा पाहून नेटकरी संतापले; म्हणाले…

एका युजरने, “आलिया… रणबीरची काहीतरी तक्रार सांगत असेल”, तर दुसऱ्या एका युजरने “तिघेही गॉसिप म्हणून रणबीर कपूरबद्दल बोलत आहेत.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर दिल्या आहेत. दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने २०२२ मध्ये लग्न केले, तर कतरिना-विकी २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

Story img Loader