विवाहित महिलेसाठी करवा चौथ हे व्रत फारच खास मानले जाते. त्यात नवविवाहित लग्न झालेले असेल तर मग वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफने तिचा पहिला करवाचौथ साजरा केला. कतरिना आणि विकी कौशलचा हा पहिलाच करवा चौथ असल्याचे तो फारच स्पेशल होता. विशेष म्हणजे तिने तिच्या सासरच्या मंडळींसोबत अगदी पारंपारिकरित्या करवा चौथ साजरा करण्यास प्राधान्य दिले.
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर याबद्दलचे काही फोटो शेअर केले आहे. यात तिचा पती अभिनेता विकी कौशल, सासूबाई आणि सासरे दिसत आहेत. मोठ्या थाटामाटात त्या दोघांनी करवा चौथ साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे. फक्त विकी कौशलने नव्हे तर त्याच्या आईनेही सूनेच्या पहिल्या करवा चौथसाठी जय्यत तयारी केली होती.
आणखी वाचा : “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा
कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत ती फार सुंदर दिसत आहेत. यावेळी विकी कौशलने क्रीम रंगाचा कुर्ता-पायजामा घातला आहे. तर कतरिनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी कतरिनाच्या कपाळावर टिकली, भांगेत कुंकू, हातात लाल बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत आहे. कतरिनाने केलेल्या या साजशृगांरात ती फारच गोड दिसत आहे. कतरिना आणि विकीने शेअर केलेले फोटो हे त्यांच्या मुंबईतील घरातील आहेत.
आणखी वाचा : Video : “माझं नाव शाकाल नाही….” अभिनेते वैभव मांगले संतापले; पाहा नेमकं काय घडलं?
कतरिनाच्या या फोटोवर अनेक कलाकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने यावर कमेंट केली आहे. अभिनंदन खूप सुंदर, असे प्रियांकाने म्हटले आहे. तर करिश्मा कपूरने पहिल्या करवा चौथच्या शुभेच्छा, अशी कमेंट केली आहे. तसेच श्वेता बच्चन, झोया अख्तर, शर्वरी वाघ, इलियाना यासारख्या अनेक अभिनेत्रींनी तिच्या या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केला आहे.
दरम्यान कतरिनाप्रमाणे अनेक बॉलिवूड कलाकारांनी करवा चौथचे व्रत केले. यावेळी शिल्पा शेट्टी ते रवीना टंडन या अभिनेत्री अनिल कपूर यांच्या घरी करवा चौथच्या सेलिब्रेशनसाठी दाखल झाल्या होत्या. कतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट या ठिकाणी ते विवाहबंधनात अडकले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता.