बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक, कतरिना कैफ आणि विकी कौशल, यांनी काल (९ डिसेंबर २०२४) त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विकीबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर करत, त्याला एक गोड कॅप्शन दिले आहे.

कतरिनाने या फोटोसाठी “दिल तू, जान तू…” असे कॅप्शन दिले आहे. फोटोमध्ये कतरिना आणि विकी कॅज्युअल कपड्यांत अतिशय आकर्षक दिसत आहेत. कतरिनाचा नो मेकअप लूक तिच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक दाखवत आहे. दोघांनीही या फोटोमध्ये गॉगल्स घातल्याचे दिसून येत आहे.

Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Abhidnya bhave Anniversary Post
“My सर्वस्व मेहुल पै…”, लग्नाच्या वाढदिवशी अभिज्ञा भावेची पतीसाठी रोमँटिक पोस्ट; मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Kshiti Jog Birthday hemant dhome special post
“पाटलीणबाई आज तुमचा जन्म…”, क्षिती जोगच्या वाढदिवशी हेमंत ढोमेची खास पोस्ट! बायकोला शुभेच्छा देत म्हणाला…

हेही वाचा…कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”

या फोटोमधील ठिकाणाबाबत जोडप्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, ते नेहमीच सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी राजस्थानला जाणे पसंत करतात. विकी कौशलने त्याच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर काहीही शेअर केलेले नसले तरी कतरिनाच्या या पोस्टने चाहत्यांचे आणि कलाकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. करीना कपूरने या पोस्टवर कमेंटबॉक्समध्ये हार्ट ईमोजी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कतरिना आणि विकीचा प्रेमप्रवास

कतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बर्वारामध्ये एका खासगी समारंभात लग्न केले. त्यांच्या प्रेमाची सुरुवात २०१९ साली करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर या जोडप्याने त्यांचे लग्न होईंपर्यंत ते एकमेकांना डेट करत असल्याच्या विषयावर नेहमी बोलणे टाळले. त्यांनी त्यांच्या लग्नाआधी पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमधील साम्य शोधून चाहत्यांनी त्यांच्या डेटिंगबाबत अंदाज लावले होते, पण दोघांनीही त्यांच्या नात्यावर बोलणे टाळले.

हेही वाचा…Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ मधल्या ‘या’ आडनावावरुन करणी सेना आक्रमक, निर्मात्यांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा

दरम्यान या जोडीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा यापूर्वी यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणारा होता. मात्र, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाशी टक्कर टाळण्यासाठी याची तारीख पुढे ढकलण्यात आली. तर कतरिना कैफ यावर्षी आलेल्या विजय ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटात झळकली होती. सध्या तिच्या नवीन प्रोजेक्ट्सची घोषणा होणे बाकी आहे.

Story img Loader