बॉलीवूड कलाकारांना भारतात लोकप्रियतेचे वलय आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी आणि सेल्फी टीपण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यात काही अतिउत्साही चाहत्यांच्या त्रासाला कलाकारांना सामोरे जावे लागते. अभिनेत्री कतरिना कैफलाही नुकताच असाच काहीसा अनुभव आला आहे. मुंबई विमानतळावरचा कतरिना सेल्फी घेण्यासाठी आलेल्या तिच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा- बॉलिवूडमध्ये मुस्लीम कलाकारांशी भेदभाव केला जातो का? हुमा कुरेशी म्हणाली, “आजही…”
कतरिना कैफचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, कतरिनाने डेनिमसह तपकिरी रंगाचा शीअर टॉप घातलेला दिसत आहे. विमानतळावर कतरिनाला पाहताच तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी केली होती. कतरिनाही चाहत्यांना सेल्फी देत होती. मात्र, गर्दी वाढली आणि चाहत्यांनी कतरिनाला चारही बाजूंनी घेरले. तिला बाहेर पडणे कठीण झाले होते. अखेर कतरिनाला गर्दीतून बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना चाहत्यांना बाजूला ढकलावे लागले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कतरिना कैफ पती विकी कौशलबरोबर सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेली होती. काही दिवसांपूर्वी विकी आणि कतरिनाचा एका चाहत्याबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघेही कॅज्युअल लूकमध्ये फॅन्ससोबत पोज देताना दिसले. हा फोटो फॅन पेजने शेअर केला आहे.
कतरिनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं काही दिवसांपूर्वी तिचा ‘फोन भूत’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होते. आती ती लवकरच विजय सेतुपतीबरोबर ‘मैरी क्रिसमस’मध्ये दिसणार आहे. तसेच तिचा सलमान खानबरोबरचा ‘टायगर ३’ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.