अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif)ने बूम या चित्रपटातून पदार्पण केले होते. २००३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सरकार, मैंने प्यार क्यूँ किया, हमको दिवाणा कर गया, रेस, पठाण, अग्नीपथ, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टायगर, जब तक हैं जान, झिरो, अशा अनेक चित्रपटातून कतरिना कैफने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच ती डान्ससाठीदेखील ओळखली जाते. आता अभिनेत्रीच्या एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होताना दिसत आहे.
लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफने नुकतीच करिश्मा नावाच्या एका मैत्रीणीच्या लग्नात हजेरी लावली होती. या लग्नातले अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये ती सुरज की बाहों में गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीबरोबर कबीर खान यांची मुलगीदेखील दिसत आहे. दोघी सुरज की बाहों में या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हे गाणे लोकप्रिय चित्रपट जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील आहे. यामध्ये कतरिना कैफ महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर प्रुमख भूमिकेत दिसले होते.
याआधी कतरिनाचा आणखी एक व्हि़डीओ व्हायरल होताना दिसला होता. ज्यामध्ये ती ससुराल गेंदा फूल या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. त्याबरोबरच, कतरिनाने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये कतरिना व तिच्या बहिणीचे काही फोटो पाहायला मिळाले होते.
तिची मैत्रीण करिश्मा व तिच्या नवऱ्याची झलकही या फोटोंमध्ये पाहायला मिळाली होती. कतरिनाने तिच्या करिश्माबरोबरच्या १६ वर्षांच्या मैत्रीचा उल्लेख करीत लिहिले, “तुझ्यासारखं कोणीच नाहीये. आपण १६ वर्षापूर्वी जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो. तेव्हाचा तुझ्या आनंद आणि वेडेपणा माझे लक्ष वेधून घेत होता. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. तू कोणत्याही परिस्थितीत असलीस तरीही तू नेहमीच आयुष्याच्या चढ-उतारात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस”, पुढे कतरिनाने करिश्माचे धाडसी, उदार व प्रेमळ म्हणत कौतुक केले आहे. तसेच तिच्यासाठी आनंदी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी छावाच्या स्क्रीनिंगवेळी दिसली होती. कतरिनाचा पती विकी कौशलने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत.