दिवाळीनंतर बॉलिवूडच्या हॅलोवीन पार्टीची सगळीकडे चर्चा आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी हॅलोवीन पार्टीसाठी केलेल्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना कतरिना कैफच्या लूकने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. कतरिनाने हॅलोवीनसाठी डीसी कॉमिकमधील हार्ले क्वीनचा लूक केला होता.

कतरिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हॅलोवीन पार्टीसाठी केलेल्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. शॉर्ट जीन्स व गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला होता. तिने मेकअप आणि हेअरस्टाइलने हुबेहुब हार्ले क्वीनसारखा लूक केला होता. फोटोसाठी कतरिनाने खास पोझही दिल्या आहेत. हॅलोवीन पार्टीसाठी तिने केलेल्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”

हेही वाचा >> Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

हेही वाचा >> Video: प्रमोशनदरम्यान कतरिना कैफ ‘हाऊ इज द जोश’ म्हणाली अन्…; व्हायरल व्हिडीओ पाहा

कतरिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव करत मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांना कतरिनाचा हा लूक भावला आहे. तर काही चाहत्यांच्या पसंतीस तिचा हा लूक उतरलेला नाही. एका चाहत्याने कमेंट करत “पहिला मला फोटो पाहून आकाशकंदील वाटला”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “रणवीर सिंगला भेटणं बंद कर”, अशी कमेंट करत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. एका नेटकऱ्याने “रणवीर सिंगचे गुण आणि लग्न विकी कौशलबरोबर”, अशी कमेंट केली आहे.

हेही पाहा >> Photos : देवेंद्र फडणवीसांना जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची भूरळ, म्हणाले “हा चित्रपट …”

कतरिना ‘फोन भूत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ‘फोन भूत’ चित्रपटात कतरिनाबरोबर अभिनेता इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही झळकणार आहेत.

Story img Loader