जगभरात काल ईदचा उत्साह दिसून आला. अनेक बॉलिवूड कलाकरांनी यंदा ईद उत्साहात साजरी केली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सलमान खानची बहीण अर्पिता खानने ईदनिमित्त जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, या पार्टीत चर्चा रंगली ती कतरिना कैफची. कतरिना कैफने २०२१ मध्ये अभिनेता विकी कौशलशी लग्न केले. लग्नानंतर कतरिना प्रेग्नंट असल्याची अनेकदा अफवा उडाली आहे. आता कतरिनाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून ती गरोदर असल्याचा चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा- “तू मुसलमान कधीपासून झाला..”; ईदच्या शुभेच्छा देणं गायक शानच्या आलं आंगलट, सोशल मीडियावर गोंधळ
अर्पिता खानच्या ईद पार्टीत कतरिनाही सहभागी झाली होती. पार्टीसाठी कतरिनाने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, सगळ्यांची नजर खिळली ती तिच्या पोटावर. पापाराझींना पाहताच कतरिना त्यांना पोझ देण्यासाठी समोर उभी राहिली. पण पोझ देत असताना ती सतत तिची ओढणी सांभाळताना दिसली आणि तिचा हात सतत तिच्या पोटाच्या समोर घेऊन येत होती. पार्टीतील कतरिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांच्या मते व्हिडीओत ती आपलं बेबी बंप ओढणीने लवण्याचा प्रयत्न करत आहे.
या पार्टीत कतरिना कैफसोबत तिचा पती विकी कौशल दिसला नाही. तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत विकी कुठे आहे? कतरिना तिचं बेबी बंप लपवते अशा कमेंट केल्या आहेत. नेटकरी इथेच थांबले नाही तर काहींनी ते घटस्फोट घेणार आहेत का? अशा कमेंट देखील केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ती तिची प्रेग्नंसी लपवते की मला असं वाटतयं… काहीही असेल पण मी तिच्यासाठी आनंदी आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, ती प्रेग्नंट आहे असं मला वाटतंय. ज्या प्रकारे ती स्वत: ला सांभाळते आणि कपडे परिधान करते त्यावरून तेच दिसतय.
हेही वाचा-
कतरिना कैफने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. या फोटोत कतरिनाने पांढरा ड्रेस घातला असून ती घराच्या बाल्कनीत बसलेली होती. फोटोत तिचा चेहरा खूपच ग्लो करत होता. त्यावरुन ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. गेल्या काही दिवसांपासून कतरिनाचे जे काही फोटो समोर आले त्यात अभिनेत्री एकतर सैल कपड्यात किंवा हाताने पोट झाकलेली दिसून येत होती. त्यामुळे ती गरोदर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.