कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नाला दीड वर्ष झालं आहे, पण या दोघांच्या वैवाहिक आयुष्याची खूप चर्चा होत असते. त्याचं मुख्य कारण म्हणजे दौघांची कौटुंबीक पार्श्वभूमी होय. विकीला कतरिनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले की तो मनमोकळेपणाने उत्तरं देतो. नुकताच विकीला कतरिनाच्या खाण्याच्या सवयीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विकीने आमचं लग्न म्हणजे ‘पराठा वेड्स पॅनकेक्स’ असल्याचं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

कतरिना कैफ फिटनेसबद्दल खूप जागरुक आहे, त्यामुळे तिला पराठे खायला आवडतात का? असा प्रश्न विकीला विचारण्यात आला. यावर विकीने खुलासा केला की कतरिनाला तिच्या माझ्या आईने बनवलेले पराठे खायला खूप आवडतात. तो ‘न्यूज तक’शी बोलताना म्हणाला, “आमचे लग्न पराठा वेड्स पॅनकेक्स आहे. तिला पॅनकेक्स आवडतात आणि मला पराठे खूप आवडतात. ती पण पराठे खाते. तिला माझ्या आईच्या हातचे पराठे खूप आवडतात.”

दरम्यान, दोघांचं लग्न व डेटिंगबद्दल बोलायचं झाल्यास विकी आणि कतरिना अनेक दिवस गुपचूप एकमेकांना डेट करत होते. त्यांनी आपलं नातं लपवून ठेवलं होतं, पण अखेर डिसेंबर २०२१ मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. दुसरीकडे, विकीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जूनला प्रदर्शित झाला आहे, तर कतरिनाने सलमान खानबरोबर ‘टायगर ३’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif loves eating paratha made by mom in law reveals vicky kaushal hrc