रणबीर कपूर व कतरिना कैफ एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. पण, नंतर दोघांचं ब्रेकअप झालं आणि कतरिनाने विकीशी लग्नगाठ बांधली, तर रणबीरनेही आलिया भट्टशी लग्न केलं. काही दिवसांपूर्वी रणबीरची आई नीतू कपूर यांनी एक स्टोरी टाकली होती, त्या स्टोरीतून त्यांनी अप्रत्यक्षपणे रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सवर निशाणा साधल्याची चर्चा होती, त्यानंतर कतरिनाच्या आईचीही एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टसंदर्भात आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुझे स्तन मोठे नाहीत” म्हणत राधिका आपटेला भूमिका नाकारलेली; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “लोक तुमच्या शरीरावर…”

नीतू कपूर काय म्हणाल्या होत्या?

“त्याने तुम्हाला सात वर्षे डेट केलं, याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असं नाही. माझे काका सहा वर्षे वैद्यकशास्त्र शिकले, पण आता ते डीजे आहेत,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली होती. त्यांच्या स्टोरीचा हा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकरी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदूकोण व कतरिना कैफशी जोडत होते. अशातच कतरिनाच्या आईच्या अकाउंटवरची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

नीतू कपूर यांची पोस्ट

कतरिनाच्या आईची पोस्ट काय?

कतरिनाच्या आईच्या नावाच्या अकाउंटवरून एक पोस्ट टाकण्यात आली आहे. सुझान यांनी पोस्ट केली आहे. त्यात, ‘मला अशी शिकवण देण्यात आली की तुम्ही कंपनीच्या सीईओला जितका आदर देता तितकाच आदर सफाई कर्मचार्‍यांना द्या,’ असं लिहिलं होतं.

कतरिना कैफच्या आईची आधीची पोस्ट

कतरिनाच्या आईचं स्पष्टीकरण

“मी माझ्या फोनवर जुने फोटो बघत होते आणि त्यात मला हा फोटो दिसला. मला त्यात लिहिलेलं आवडलं म्हणून मी तो फोटो पोस्ट केले. परंतु हे कोणत्याही प्रकारे कोणाला उद्देशून किंवा सोशल मीडियावर चर्चा असल्याप्रमाणे कोणावरही कमेंट करण्यासाठी नव्हतं,” असं कतरिनाच्या आईने पोस्टचं कॅप्शन एडीट करत म्हटलं आहे.

कतरिनाच्या आईने दिलेलं स्पष्टीकरण

कतरिनाच्या आईच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. काहींनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत नीतू कपूर यांच्यावर निशाणा साधला आहे.