अभिनेता रणबीर कपूरची आई व ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो, व्हिडीओज शेअर करत असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक स्टोरी शेअर केली होती. ती स्टोरी त्यांनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सना टोला लगावण्यासाठी टाकली होती, अशी चर्चा रंगली होती. अशातच आता कतरिनाच्या आईने एक पोस्ट टाकली आहे आणि ते नीतू कपूर यांना उत्तर असल्याचं म्हटलं जातंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिणीती चोप्राशी लग्नाच्या चर्चा; खासदार राघव चड्ढांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले, “तुम्हाला सेलिब्रेशन…”

नीतू कपूर काय म्हणाल्या होत्या?

“त्याने तुम्हाला सात वर्षे डेट केलं, याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असं नाही. माझे काका सहा वर्षे वैद्यकशास्त्र शिकले, पण आता ते डीजे आहेत,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली होती. त्यांच्या स्टोरीचा हा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकरी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदूकोण व कतरिना कैफशी जोडत होते. अशातच कतरिनाच्या आईच्या अकाउंटवरची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

नीतू कपूर यांची स्टोरी

कतरिनाच्या आईची पोस्ट काय?

कतरिनाच्या आईच्या नावाच्या अकाउंटवरून एक पोस्ट टाकण्यात आली आहे. सुझान यांनी पोस्ट केली आहे. त्यानुसार, ‘मला अशी शिकवण देण्यात आली की तुम्ही कंपनीच्या सीईओला जितका आदर देता तितकाच आदर सफाई कर्मचार्‍यांना द्या.’ दरम्यान, कतरिनाच्या आईचं हे अकाउंट अधिकृत आहे की नाही, याबद्दल कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. पण नाव व अकाउंटवरील फोटोंमुळे, तसेच त्यांच्या पोस्टच्या टायमिंगमुळे हे त्यांचंच अकाउंट असल्याचं म्हटलं जातंय.

कतरिनाच्या आईच्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट

या पोस्टवर नेटकरीही कमेंट्स करत आहेत. काहींच्या मते कतरिनाच्या आईने नीतू कपूर यांना उत्तर देण्यासाठी पोस्ट टाकली आहे. तर काहींच्या मते दोघींच्या पोस्टमधील टायमिंगमुळे तसं वाटत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif mother replied to ranbir kapoor mom neetu kapoor after she takes dig at his ex gf viral post hrc