अभिनेत्री कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. गेल्या वर्षी तिचे विकी कौशलबरोबर लग्न झाले. आता लग्नानंतर ती पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतर प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिनाने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांना आतापर्यंत हजेरी लावली. पण आता तिची थेट टी-२० वर्ल्ड कपमध्ये एंट्री झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “बॉलिवूडमध्ये राष्ट्रविरोधी गँग…”; कंगना रणौतचे टीकास्त्र, आमिर खानच्या नावाचाही केला उल्लेख

काल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना रंगला. सर्वजण हा सामना एकाग्रतेने बघत होते. अशातच यात कतरिना कैफची एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाला चीअर करायला ती स्टार स्पोर्ट्सवर आली होती. इतकंच नाही तर यावेळी तिच्या आत दडलेली क्रिकेटरही प्रेक्षकांना पाहायला मिळाली. यावेळी तिच्याबरोबर ‘फोन भूत’मधील सहकलाकर ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कालच्या सामन्यादरम्यान ‘स्टार स्पोर्ट्स’ या चॅनेलवर हरभजन सिंग बॉलिंग करत होता आणि कतरिना बॅटिंग करताना दिसली. तर ईशान आणि सिद्धांत हे दोघे फिल्डिंग करताना दिसले. कतरिनाने हाय हिल्स घातल्याने क्रिकेट खेळणे तिला थोडे कठीण जात होते. पण “हिल्स घालून क्रिकेट खेळणे थोडे कठीण आहे, पण मी मॅनेज करू शकते,” असे कतरिना म्हणाली. पुढे हरभजन सिंगने टाकलेल्या चेंडूंवर कतरिनाने चौकार आणि षटकारही मारले. यानिमित्ताने कतरिना उत्तम अभिनय करण्याबरोबरच क्रिकेटही चांगली खेळते हे सर्वांना कळले. काल तिच्यात दडलेली क्रिकेटर प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

हेही वाचा : “माझ्या सासूबाई माझ्यासाठी…”, कतरिना कैफने सांगितले लग्नानंतरच्या तिच्या फिटनेसचे रहस्य

‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळेदेखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ ४ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif played cricket with harbhajan singh rnv