कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं कायमच चर्चेत असतं. लग्नानंतर दोघंही एकमेकांवर असणारं प्रेम उघडपणे व्यक्त करताना दिसतात. एकनेकांच्या फोटोंवर कमेंट्स करणं, एकमेकांसाठी खास पोस्ट करणं हे ते नेहमीच करत असतात. ती दोघंही एकमेकांना खूप चांगला पाठिंबा देत असतात. आता लग्नानंतर ती पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतर प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच आता विकी कौशल तिचा दिग्दर्शक बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “माझ्या सासूबाई माझ्यासाठी…”, कतरिना कैफने सांगितले लग्नानंतरच्या तिच्या फिटनेसचे रहस्य

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे हॅलोवीन पार्टीच्या फोटोशूटचा. बॉलिवूड सेलिब्रिटींनी हॅलोवीन पार्टीसाठी केलेल्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना कतरिना कैफच्या लूकने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. कतरिनाने हॅलोवीनसाठी डीसी कॉमिकमधील हार्ले क्वीनचा लूक केला होता. या फोटोशूटच्या वेळी तिचा पती विकी कौशल तिचा दिग्दर्शक झाला होता.

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती कॅमेऱ्यासमोर फोटोशूट करताना दिसत आहे. यादरम्यान तिचा पती विकी कौशल तिला पोज कशी द्यायची हे शिकवत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कतरिनाने एक कॅप्शनही लिहिली आहे आणि या कॅप्शनने नेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कतरिना कैफने कॅप्शनमध्ये लिहिलं, “जब पती डायरेक्टर बन जाये.” यावेळीही कतरिना आणि विकीमधील केमिस्ट्री नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे. यावर कमेंट्स करत नेटकरी विकी आणि कतरिनाचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा : कतरिना कैफच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, ‘या’ भीतीमुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय

दरम्यान कतरिना लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ‘फोन भूत’ चित्रपटात कतरिनाबरोबर अभिनेता इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही झळकणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif posted a video of vicky kaushal instructing her to pose rnv