बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली यांची जोडी संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यादरम्यान अभिनेत्री तिच्या नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर सर्व क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती. अशातच अनुष्काने भर स्टेडियममध्ये विराटला धीर देत त्याला मिठी मारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरुष्काचा एकमेकांना मिठी मारतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून या जोडप्याच्या बॉण्डिंगचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावर आता मनोरंजन कलाविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विराट-अनुष्काच्या नात्याचं बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने कौतुक केलं आहे. हे दोघंही कतरिना कैफचे शेजारी आहेत.

हेही वाचा : अधिपतीच्या अक्षराने ‘या’ मालिकेद्वारे केलेलं कलाविश्वात पदार्पण, साकारलेली विशाखा सुभेदार अन् वैभव मांगलेंच्या लेकीची भूमिका

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कतरिनाला सामन्यातील समालोचकांनी विराट-अनुष्काबद्दल विचारलं यावर अभिनेत्री म्हणाली, “ते दोघंही एकमेकांना खूप चांगली साथ देतात. कोणत्याही परिस्थितीत ते दोघं एकमेकांसाठी खंबीरपणे उभे असतात. विराट खेळत असताना अनुष्का किती आनंदी असते ते आपण तिच्या चेहऱ्यावर पाहू शकतो. दोघांमध्ये फारचं सुंदर असं नातं आहेत.”

हेही वाचा : इन्स्टाग्रामवर फेक फॉलोवर्स विकणाऱ्या नेटकऱ्याला सिद्धार्थ चांदेकरचं रोखठोक उत्तर; म्हणाला, “तुलाच का…”

विराट कोहलीच्या फिटनेसबद्दल कतरिना म्हणते, “विराट आपल्या सगळ्यांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. त्याने या खेळासाठी स्वत:ला खूप जास्त फिट ठेवलं आहे. त्याच्याकडून मेहनत, खेळ आणि व्यायामातील शिस्त अशा खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. “

दरम्यान, कतरिना कैफ सध्या ‘टायगर ३’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये सलमान खान-कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असून इम्रान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif praised anushka sharma and virat kohli after worldcup 2023 final match sva 00