कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलीवूडचं लोकप्रिय कपल आहे. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. या दोन वर्षांत अनेकदा कतरिना गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. अलीकडेच जामनगरवरून परततानासुद्धा कतरिना प्रेग्नेंट असल्याची शक्यता वर्तवली जात होती, पण या कपलकडून तसा काही खुलासा आजतागायत झालेला नाही. आता लग्नाच्या इतक्या वर्षांनी चाहते या गुड न्यूजची वाट पाहतायत. अशातच चाहत्यांसाठी कदाचित ही गुड न्यूज खरी ठरण्याची शक्यता आहे.

नुकतीच कतरिना कैफ मुंबई विमानतळावर दिसली होती. विशेष म्हणजे कतरिनाच्या ‘एअरपोर्ट लूक’मुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या ‘एअरपोर्ट लूक’साठी कतरिनाने सफेद रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. यावर तिने ओव्हरसाईज्ड काळ्या रंगाचं लेदर जॅकेट घातलं होतं. ग्लासेस, बन आणि मॅचिंग बूट्समध्ये कतरिना सुंदर तर दिसतच होती, पण चाहत्यांनी या ड्रेसचा संबंध तिच्या प्रेग्नेंसीशी जोडला आहे.

Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

आजपर्यंतचा बॉलीवूडमधील इतिहास पाहायला गेलो तर ज्या अभिनेत्री पोलका डॉट ड्रेसवर पाहायला मिळाल्या आहेत, त्यांनी लगेचच गुड न्यूज दिली आहे. अनुष्का शर्मा, करिना कपूर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, नताशा स्टँकोविक या अभिनेत्री गुड न्यूज देण्याआधी अशा पोलका डॉट ड्रेसवर पाहायला मिळाल्या होत्या.

हेही वाचा… ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा मराठीतील ट्रेलर प्रदर्शित; अंकिता लोखंडे म्हणाली, “मला खरंच…”

कतरिनाचा विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यावर चाहत्यांनी तर्कवितर्क लावून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण “पोलका डॉट ड्रेस म्हणजे गुड न्यूज आहे का?” अशाप्रकारच्या कमेंट्स करत आहेत. तर काही जण म्हणतायत, “४० वर्षांची असताना ती गुड न्यूज कशी काय देऊ शकते?, सरोगसी हा पर्याय असू शकतो.”

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातून परतताना कतरिनाच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी कतरिनाने फिकट गुलाबी रंगाची अनारकली परिधान केली होती आणि यावर ओढणी घेत तिने पोटापर्यंत शरीर झाकलं होतं. यामुळे बाकीच्या अभिनेत्रींसारखचं कतरिनासुद्धा गरोदर आहे का? अशी चर्चा सुरू झाली होती.

हेही वाचा… सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; ‘या’ व्यक्तीबरोबर खास फोटो शेअर करत म्हणाली, “मला माझ्या…”

दरम्यान, कतरिना कैफच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटात कतरिना झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. आता कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यन आणि श्रद्धा कपूरसह कतरिना कैफ दिसणार आहे.

Story img Loader