बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चेत असतात. आता अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) तिने मेकअपबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
काय म्हणाली कतरिना कैफ?
कतरिना कैफने अमेरिकन मेकअप आर्टिस्ट हुडा कटानशी (Huda Kattan) बोलताना तिला मेकअपची किती आवड आहे, याबद्दल सांगितलं. कतरिना कैफ म्हणाली, “मी किशोरवयात असल्यापासूनच मला मेकअपची आवड आहे. माझ्यासाठी तो व्यक्त होण्याचा एक मार्ग होता. मी खूप लाजाळू होते, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, पण मी खरंच खूप कमी बोलायचे. कसं ते माहीत नाही, पण मेकअपमुळे माझ्यासाठी व्यक्त होण्याचा एक मार्ग तयार झाला. मॉडेल म्हणून जगातील सर्वोत्तम मेकअप आर्टिस्टसमोर बसण्याची संधी मला मिळवून दिली.”
कतरिना पुढे म्हणाली, “मी नेहमी मेकअप आर्टिस्टना प्रश्न विचारत असे. त्यांच्या टेक्निकचे निरीक्षण करत असे. त्या सगळ्या टेक्निक मी खूप लवकर शिकले. मला याची जाणीव झाली की मला माझा चेहरा खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे. मला माहिती आहे की, मला कशाप्रकारे दिसायला आवडेल. मला स्वत:च मेकअप करायला आवडतं.”
कतरिना म्हणाली, “मी कधीच थेट लिपस्टिक लावत नाही. आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी कधीच लिपस्टिक थेट माझ्या ओठांना लावली नाही. मी लिप ब्रशचा वापर करून लिपस्टिक लावते, त्यावर थोडा लिप बाम लावते; कारण मला माझे ओठ मुलायम असलेले आवडतात.” चित्रपटातील पात्रांनी कोणत्या प्रकारचा मेकअप केला पाहिजे हेदेखील मला आता कळतं, असं कतरिनाने नमूद केलं.
रुहवानी कलाच्या शिवानी तल्ला यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मेकअप आर्टिस्टसाठी चेहरा हा कॅनव्हास असतो. जसे पेंटर त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी रंगांचा वापर करतात, तसेच मेकअपदेखील तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमचा मूड अधिक खुलण्यास मदत करतो. तुम्ही कोण आहात आणि एखाद्या दिवशी तुम्हाला काय वाटते, तुमच्या भावना काय आहेत, याचे प्रतिबिंब मेकअपमधून दिसते. तसेच मेकअपमुळे तुमचे मनोबल वाढते. मेकअपमुळे एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढू शकतो.”
दरम्यान, कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या फिटनेस आणि चित्रपटांसाठी ओळखली जाते. चित्रपटांबरोबरच तिचे स्वत:चे ‘काय ब्युटी’ नावाचे मेकअप ब्रँडदेखील आहे.