Katrina Kaif Sister Isabelle Bollywood Debut : ‘नमस्ते लंडन’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘जिंदरी ना मिलेगी दोबारा’, ‘धूम ३’, ‘बॅंग बॅंग’ या आणि अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे कतरीना कैफ. कतरिना ही बॉलिवूडची यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. आता तिच्याच पाउलावर पाऊल ठेवत तिची बहीणही या क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

कतरिना कैफच्या बहिणीचं बॉलीवूड पदार्पण

कतरिना कैफची बहीण इसाबेल ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे. इसाबेल पुलकित सम्राटसह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये पुलकित दिल्लीमधील अमन नावाच्या एका मुलाची भूमिका करणार असून इसाबेल आग्र्यातील नूर नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.

पुलकित सम्राट आणि इसाबेलचा ‘सुस्वागतम खुशामदीद’चा टीझर रिलीज

पुलकित सम्राट आणि इसाबेल यांच्या ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुलकित सम्राटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘सुस्वागतम खुशामदीद’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “दोन आत्मा, दोन देश, एक प्रेमकथा. सुस्वागतम खुशामदीदचा टीझर रिलीज झाला आहे” असं म्हटलं आहे.

पुलकित सम्राट आणि इसाबेल कैफच्या भूमिकांनी वेधलं लक्ष

पुलकित सम्राट आणि इसाबेल कैफ यांच्या या चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या धर्मातील आणि वेगवेगळ्या देशांतील पात्रांची कथा असल्याचे टीझरमधून कळत आहे. या टीझरमध्ये दोन्ही पात्रांचा कोणताही संवाद नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या धर्मातील या पात्रांची प्रेमकथा चित्रपटात कशी पूर्ण होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. येत्या १६ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इसाबेल कैफने पहिल्या चित्रपटाबद्दल व्यक्त केल्या भावना

न्यूज १८ च्या वृत्तानुसार, पहिल्या चित्रपटाबद्दल इसाबेलने भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “या चित्रपटाचा भाग असणे हा एक अद्भुत अनुभव होता. पुलकित आणि दिग्दर्शक धीरज यांच्याबरोबर काम करून खुप छान वाटलं. आम्हाला चित्रीकरण करताना खूप मजा आली आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.”

पुलकित सम्राटने सुस्वागतम खुशामदीद’ व्यक्त केल्या भावना

यापुढे पुलकितने चित्रपटाबद्दल असं म्हटलं की, “एका चांगल्या कथेचा आणि चांगल्या टीमचा भाग असल्याचा मला आनंद आहे. इतक्या प्रेमाने बनवलेला चित्रपट प्रदर्शित करणार आहोत याचा मला आनंद आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना मनापासून आणि मेहनतीने केलेले काम पाहण्याची विनंती करतो.”

पुलकित सम्राट आणि इसाबेल कैफ व्यतिरिक्त, सुस्वगतम् खुशामदीदमध्ये साहिल वैद, प्रियांका सिंग, ऋतुराज सिंग, मेघना मलिक, अरुण बाली, नीला मुल्हेरकर, मनु ऋषी चड्ढा, प्रशांत सिंग, राजकुमार कनौजिया, मेहुल सुराणा, श्रुती उल्फाद आणि सऊरोज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.