सध्या बॉलिवूड कलाकार ख्रिसमसच्या सेलिब्रेशननंतर व्हेकेशनसाठी जाताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. असाच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात मुंबई विमानतळावर कतरिना कैफला पोलिसांनी अडवल्याचं दिसत आहे. कतरिनाच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहून, विकी आणि कतरिना ख्रिसमस व्हेकेशनसाठी जात असल्याचा अंदाज लावला जात आहे. कतरिनाने ख्रिसमससाठी परफेक्ट असे कपडे घातले होते. त्याचबरोबर सनग्लासेस, व्हाइट स्पोर्ट्स शूज आणि पोनीटेलमध्ये तिने आपला लूक पूर्ण केला आहे. तर विकी कौशल व्हाइट शर्ट, ब्लू डेनिम आणि सनग्लासेसमध्ये दिसला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विकी कौशल मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे उभे असलेला दिसत आहे आणि सीआयएसएफ अधिकारी त्याची कागदपत्रं तपासताना दिसत आहे. याचवेळी कतरिना कैफ आत प्रवेश करते पण सीआयएसएफ अधिकारी तिला थांबवतात आणि म्हणतात, “मॅडम चेकिंगसाठी थांबा.” त्यानंतर कतरिना कैफ प्रवेशद्वारावरून परत मागे येते.
आणखी वाचा- कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा Economy class मधून प्रवास; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…
कतरिना कैफच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच श्रीराम राघवन यांच्या ‘मेरी ख्रिसमस’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपथी मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. याशिवाय ती सलमान खानबरोबर ‘टायगर ३’ चित्रपटात दिसणार आहे.