कतरिना कैफ व विकी कौशल सेलिब्रिटी कपलची बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगताना दिसते. सोशल मीडियाद्वारे कतरिना विकीबरोबरचे बरेच फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिने नुकताच विकीचा बेडरूममधील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये गाढ झोपलेल्या विकीला ती झोपेतून उठवताना दिसली. आता कतरिनाने एका मुलाखतीदरम्यान विकीच्या त्रासदायक सवयीबाबत भाष्य केलं आहे. एरव्ही आपल्या नवऱ्याचं कौतुक करणारी ही अभिनेत्री यावेळी मात्र विकीची तक्रार करताना दिसली.

आणखी वाचा – Video : गाढ झोपलेल्या नवऱ्याबरोबर कतरिना कैफने केलं असं काही की…; बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”

‘फोन भूत’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कतरिना व्यग्र आहे. याच चित्रपटानिमित्त ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला. ती म्हणाली, “विकी जेव्हा डान्स करतो तेव्हा तो खूप खुश असतो. डान्सबरोबरच त्याला गाणं गाणंही खूप आवडतं आणि तो एक उत्तम गायकही आहे. जेव्हा मला रात्री झोप येत नाही तेव्हा मी त्याला गाणं गात मला झोपव असं सांगते.”

पुढे तिला विकीच्या कोणत्या गोष्टीमुळे तुला त्रास सहन करावा लागतो? असं विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, “विकी बऱ्याचदा खूप हट्टीपणा करतो. मला त्याच्या याच स्वभावाची खूप चीड येते.” म्हणजेच विकीचा हट्टीपणा कतरिनाला अगदीच आवडत नसल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे.

आणखी वाचा – टेरेंस लुईसने नोरा फतेहीला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श? कोरियोग्राफर म्हणतो, “मला शिवीगाळ…”

या मुलाखतीदरम्यान कतरिनाला सलमान खान ही व्यक्ती म्हणून कशी आहे? असं विचारण्यात आलं. यावेळी तिने “त्याचं व्यक्तीमत्त्व खूपच मजेशीर आहे.” असं म्हटलं. तसेच आलियाबाबत विचारताच ती माझ्यासाठी कायमच खास राहणार असंही कतरिनाने म्हटलं.

Story img Loader