कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. कतरिना-विकीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यामध्ये त्यांच्या चाहत्यांना रस असतो. कतरिना-विकी त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहेत. यादरम्यानचेच काही फोटो दोघांनीही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते. आता कतरिनाने बेडरूममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. याचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
कतरिना-विकीने लग्न करत सगळ्यांना सुखद धक्काच दिला. या दोघांचे रोमँटिक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आपण पती नवऱ्याला झोपेमधून कसं उठवतो हे कतरिनाने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे. या सेलिब्रिटी कपलचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये विकी बेडवर झोपलेला दिसत आहे. कतरिना तो झोपलेला हा आहे हे पाहून त्याच्याजवळ जाते. नवरा गाढ झोपलेला आहे हे पाहून कतरिना त्याच्याजवळ जाते. “मैं एक भूत हूँ” असं त्याच्याजवळ जाऊन बोलू लागते. कतरिनाचा आवाज ऐकून विकी जागा होता.
आणखी वाचा – “मेरे आंखों में मत झांको…” नम्रता संभेरावची ‘लॉली’ पाहून सासूबाईंची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या…
या दोघांचा हा क्युट व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे. इतकंच नव्हे तर कतरिनाच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. काही तासांमध्येच तिच्या या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.