कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ २०२३ मधील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रेक्षक आणखीनच उत्सुक आहेत कारण कतरिना आणि विजय पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. गेले बरेच दिवस चाहते या चित्रपटाच्या घोषणेचे वाट बघत होते. विजय आणि कतरिना दोघांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या एका नवीन पोस्टरसह प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे.

आधी हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांनी दोन पोस्टर लाँच केले, एक हिंदीमध्ये आणि दुसरे तमिळमध्ये. दोन्ही पोस्टरमध्ये कतरिना आणि विजय दिसत आहेत आणि या पोस्टरने सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे.

Kanye West Wife Bianca Censori naked in Grammy Awards 2025 videos and photos viral
Grammy Awards 2025: ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रसिद्ध रॅपरची पत्नी झाली नग्न, व्हिडीओ अन् फोटो झाले व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man dance for wife on 25th anniversary
“जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात…” २५ व्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांनी’ केला बायकोसाठी जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा
elephants proposed to their partner with Flowers
सोंडेत धरली फुले अन्… हत्तीने त्याच्या पार्टनरला केले असे प्रपोज; पाहा व्हायरल VIDEO
Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Ganesh Jayanti 2025 Date, Time Shubh muhurat in marathi
Maghi Ganesh Jayanti 2025 : माघी गणेश जयंतीची पूजाविधी आणि शुभ मुहूर्त काय? वाचा एका क्लिकवर
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
NArendra modi Feta
PM Narendra Modi : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी परिधान केलेल्या फेट्याने वेधलं लक्ष; वैशिष्ट्य तर जाणून घ्या!

आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी; प्रसिद्ध अभिनेत्याची भविष्यवाणी

नवीन पोस्टर विंटेज वाइब्स प्रेक्षकांना मिळत आहेत. हिंदी पोस्टर पाहिलं तर त्यात आपल्याला जुन्या मुंबईची झलक पाहायला मिळत आहे. पोस्टरवर ‘रात जितनी संगीन होगी, सुबह उतनी रंगीन होगी’ अशी टॅगलाइन लिहिली आहे. हिंदी भाषेतील चित्रपटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्याही भूमिका आहेत, तर तमिळ भाषेतील चित्रपटात राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्या भूमिका आहेत.

अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे या दोघी अभिनेत्रीही कॅमिओमध्ये दिसणार आहेत. मीडिया रीपोर्टनुसार हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर असून याचं कथानक ख्रिसमसच्या पूर्वसंध्येभोवती फिरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘अंधाधून’, ‘बदलापूर’सारखे लाजवाब आणि हटके चित्रपट देणाऱ्या श्रीराम राघवन यांच्या या चित्रपटाची भारतीय प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे.

Story img Loader