Merry Christmas X Review : कतरिना कैफ व दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट आज (१२ जानेवारी रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते, आज अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कतरिनाचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचे चाहत्यांनी सोशल मीडियावर रिव्ह्यू दिले आहेत.

श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सस्पेन्स चित्रपट आहे. विजय सेतुपती, कतरिना कैफ, विनय पाठक व संजय कपूर यांनी उत्तम काम केलं आहे, असा रिव्ह्यू समीक्षण तरण आदर्श यांनी दिला आहे.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

कतरिना व विजयचा हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर सुरुवात करणारा नसला तरी प्रेक्षकांना आवडणारा आहे, अशा प्रतिक्रिया चाहते एक्सवर देत आहेत.

“श्रीराम राघवन यांनी नेहमीप्रमाणेच एक उत्तम थ्रिलर चित्रपट निर्माण केला आहे. पण हा त्यांच्या मागील चित्रपटांपेक्षा थोडा संथ आहे,” असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

“आताच मेरी ख्रिसमस पाहिला आणि हा एक शानदार चित्रपट आहे, कथा उत्तम रितीने सांगितली आहे. विशेषतः कतरिना आणि विजयचा अभिनय अप्रतिम आहे,” असं एका चाहत्याने म्हटलंय.

कतरिना कैफचा पती व अभिनेता विकी कौशलनेही एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. “मला तुझा खूप अभिमान वाटतोय लव्ह. किती सुंदरपणे तू स्वत:ला श्रीराम सरांच्या उत्कृष्ट स्टोरीटेलिंग आणि ‘मारिया’च्या पात्रात झोकून दिलं आहेस…तिची जादू, तिचं गूढ तू प्रामाणिकपणे आणि बारकाईने पडद्यावर दाखवलंस. हे खरोखर तुझे आजपर्यंतचे सर्वोत्तम काम आहे,” अशी पोस्ट विकीने केली आहे.

दरम्यान, कतरिना व विजय यांचा हा चित्रपट २०२४ मध्ये चित्रपटांसाठी चांगली सुरुवात मानला जात आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट पसंतीस उतरला आहे. श्रीराम राघवन यांच्या खास शैलीतील हा डार्क कॉमेडी, सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहायला हवा, अशा प्रतिक्रिया एक्सवर युजर्स देत आहेत.

Story img Loader