Katrina Kaif अभिनेत्री कतरिना कैफ ( Katrina Kaif ) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार या आघाडीच्या नायकांसह चित्रपट केले आहेत. तसंच विकी कौशलसह झालेल्या लग्नामुळेही तिची चर्चा कायम राहिली होती. कतरिना कैफ स्टाईल आयकॉन आहे. कतरिना कैफचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये कतरिना छानश्या साडीमध्ये दिसते आहे. डिझायनर साडीतला तिचा लूक लक्ष वेधून घेतो आहे. अशातच तिच्या दंडावर एक काळी पट्टी बांधलेली दिसते आहे. या पॅचनेही लक्ष वेधलं आहे. हा पॅच पाहून कतरिना कैफला ( Katrina Kaif ) काय आजार झाला? याची चर्चा रंगली आहे.

कतरिनाच्या दंडावर कसला पॅच?

कतरिना कैफच्या ( Katrina Kaif ) व्हिडीओत तिच्या दंडावर एक पॅच लावलेला दिसून येतो आहे. हा पॅच हेल्थ मॉनिटरिंग पॅच आहे. ग्लुकोज मॉनिटरिंग पॅच असं या पॅचला म्हटलं जातं. शरीरातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवण्याचं काम हा पॅच करतो. आपण दिवसभरात जे खातो ज्या प्रकारे डाएट फॉलो करतो त्यावर लक्ष ठेवण्याचं काम हा हेल्थ पॅच करतो. या पॅचने दिलेल्या रिझल्टनंतर कुठला आहार घ्यावा? काय व्यायाम करावा? याबाबत ठरवता येतं. आता कतरिना कैफने हा पॅच लावल्याने तिला मधुमेह आहे का? ही चर्चा रंगली आहे. कतरिना कैफने ( Katrina Kaif ) विकी कौशलशी लग्न केल्यापासून फारसे चित्रपट केलेले नाहीत. टायगर ३ या सिनेमात ती दिसली होती. त्यातल्या तिच्या फाईट सीनची चर्चाही सुरु होती. आता तिच्या व्हायरल व्हिडीओत तिने दंडावर कसला पॅच लावला आहे? त्याची चर्चा होते आहे.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

हे पण वाचा- “मी कधीच लिपस्टिक…”, अभिनेत्री कतरिना कैफचे वक्तव्य; म्हणाली,”मेकअपमुळे मला…”

शरीरावर लावण्यात येणारं हा पॅच एका अॅपशी कनेक्ट करता येतं. या अॅपद्वारे शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचं रिअल टाइम तपासता येतं आहे. हा पॅच कतरिनाने दंडवर लावला आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे आता तिला मधुमेह झाला आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे.

काय म्हणत आहेत नेटकरी?

CGM मॉनिटर लावणं ही नॉर्मल बाब आहे. कतरिनाला मधुमेह झाला आहे म्हणून तिने हा पॅच लावला आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर काहींनी अरेरे कतरिनाने मधुमेहामुळे साखरेची पातळी मोजण्यासाठी पॅच लावला आहे असं काही नेटकरी या व्हिडीओवर म्हणत आहेत. तो पॅच मधुमेह झाल्याने लावला आहे असंही काहींनी म्हटलं आहे. Pallav_Paliwal या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे जो चांगलाच व्हायरल होतो आहे.

Story img Loader