बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षात तिने ‘बूम’ चित्रपटाद्वारे भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपट करीत तिनं लोकप्रियता मिळवली. परंतु, इंडस्ट्रीमध्ये काम करताना एका विशिष्ट पद्धतीनेच अभिनेत्रीने दिसावं अशा प्रकारचा दबाव तिच्यावर आला होता. त्यावेळी ती खूप गोंधळात असायची आणि विकी तिला समजवायचा. त्याबद्दल एका मुलाखतीत तिनं आपला अनुभव सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच ‘हॅलो इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत, कतरिना म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी सौंदर्याच्या एका विशिष्ट साच्यात आपण स्वतःला सामावून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा दबाव मी अनेकदा अनुभवला आहे. या दबावामुळे अनेकदा मला गुदमरल्यासारखं वाटतं. बहुतेक वेळा असं होतं जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर जात असते तेव्हा मी गोंधळात असते. माझ्या मनात अनेक विचार सुरू असतात. अनेकदा माझा लूक, माझे कपडे, हेअर्स यातल्या गोष्टी मला आवडत नाहीत किंवा पटत नाहीत. मग मी त्या दुरुस्त करण्यासाठी बेचैन असते. तेव्हा माझा पती मला आठवण करून देतो की, तूच नेहमी म्हणतेच ना, “इट्स ओके टू बी यू.” (ही माझ्या मेकअप ब्रॅण्ड के ब्यूटीची टॅगलाइन आहे.)”

कतरिना पुढे म्हणाली, “तुमच्या आजूबाजूला प्रत्येक जण काय करतोय किंवा काय बोलतोय याच्या तुलनेत तुम्ही कोण आहात हे ओळखणं आणि तुमची स्वत:ची ओळख टिकवून ठेवणं खरंच खूप कठीण आहे. माझ्या आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी मी ज्या गोष्टींचं अनुकरण करते त्या गोष्टी म्हणजे आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता व दृढनिश्चय होय. आपले स्वतःचे विचार, इच्छा व ध्येयं समजून घेण्यासाठी आपण स्वत:ला वेळ दिला पाहिजे.”

हेही वाचा… “त्यानं हात ठेवून फोटो काढला नाही, तर…”, ओरीच्या सिग्नेचर पोजबद्दल रणवीर सिंहचे वक्तव्य, म्हणाला…

दरम्यान, कतरिनाबद्दल सांगायचं झाल्यास २०१९ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ उद्योजक बनली आणि कतरिनानं तिच्या मेकअपची आवड व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. ‘के ब्यूटी’ हा एक सुप्रसिद्ध ब्यूटी ब्रॅण्ड आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या २०२३ च्या अहवालानुसार, या ब्रॅण्डची वार्षिक कमाई सुमारे $१२ दशलक्ष आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif worried due to beauty standards in bollywood film industry dvr