‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलिवूडचे महानायक ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. सध्या या कार्यक्रमाचे १५ वे पर्व सुरु आहे. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याबद्दल एक खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या पर्वाला पहिला करोडपती काही दिवसांपूर्वी मिळाला. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामातील पहिला करोडपती ठरला. त्याने १ कोटी रुपये जिंकत यंदाच्या पर्वातील पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “हा चित्रपट भ्रष्टाचारावर…”
जसकरण सिंग यांच्यानंतर अश्विन कुमार हा स्पर्धक हॉटसीटवर सहभागी बसला. यावेळी अश्विन कुमारच्या पत्नीने अमिताभ बच्चन यांच्यासमोर पतीबद्दल तक्रार केली. अश्विनला माझ्या हातातील जेवण आवडत नाही. ते मला त्यांच्यासोबत बाहेरही घेऊन जात नाहीत, अशी तक्रार तिने केले.
पत्नीच्या तक्रारी संपल्यावर अश्विनने अमिताभ बच्चन यांना विचारले की “सर तुमच्या घरातही हे सर्व घडते का? तुम्ही तुमच्या पत्नीला बायकोला बाहेर फिरायला किंवा जेवायला घेऊन जाता का?” असे प्रश्न त्याने विचारले. त्या स्पर्धकाचा प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन हसायला लागले.
आणखी वाचा : इंडिया आणि भारत वादादरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय, आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल
“माझी पत्नीही काम करते. मी जेव्हा घरी पोहोचतो, तेव्हा ती संसदेत असते. त्यामुळे मी यातून सुखरुप बचावतो”, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले. त्यांच्या उत्तरानंतर सर्व उपस्थित जोरजोरात हसायला लागले.