बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण करणाऱ्या काही मोठ्या कलाकारांच्या यादीत के के मेनन हे नाव पहिल्या १० लोकांमध्ये येतं. मनोज, बाजपेयी, पंकज त्रिपाठी यांच्या रांगेत जाऊन बसलेल्या के के मेनन यांनीही या चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. ९० च्या दशकापासूनच के के मेनन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच छोट्या मोठ्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘डीएनए’ न्यूजच्या एका वृत्तानुसार नुकतंच के के यांनी त्यांच्या कारकीर्दीतील अशा भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे ज्यामुळे त्यांचं आयुष्यच बदललं. याविषयी बोलताना केके म्हणाले, “माझ्या खासगी आयुष्यात फारसा काहीच बदल झालेला नाही, ते आहे तसंच आहे, पण माझ्या फिल्मी करिअरमध्ये एका चित्रपटामुळे नक्कीच बदल झाला.”

आणखी वाचा : शाहरुख, आमिर व सलमान या तिघांनी नाकारलेला ‘हा’ चित्रपट ठरला सुपरफ्लॉप; कोणता ते जाणून घ्या

याचं उत्तर पुढे देताना के के यांनी राम गोपाल वर्मा यांच्या सरकार या चित्रपटाचा आणि त्यातील विष्णु नागरे या भूमिकेचा उल्लेख केला. तयाबद्दल के के म्हणाले, “एक असा काळ होता जेव्हा मला माझ्या नावासकट माझी ओळख या इंडस्ट्रीमध्ये वावरताना करून द्यावी लागायची. त्यानंतर मला सरकार हा चित्रपट मिळाला अन् नंतर सगळंच बदललं. नंतर मला के के म्हणूनच ओळख मिळाली, मी एक अभिनेता आहे अशी ओळख सांगायची माझ्यावर नंतर वेळच आली नाही.”

२००५ साली प्रदर्शित झालेला राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनापासून प्रेरित होता अशी चर्चा तेव्हा रंगली होती. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनी उचलून धरलं. यात प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सुप्रिया पाठक, कतरिना कैफ अनुपम खेर यांच्यासारखे कलाकार होते.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तापट स्वभाव असलेल्या मुलाची भूमिका के के यांनी निभावली होती. आता के के मेनन लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘द रेल्वे मेन’ या मिनीसीरिजमध्ये झळकणार आहेत. ही वेबसीरिज भोपाळ गॅस गळतीवर बेतलेली आहे. या सीरिजमध्ये के के मेननसह आर माधवन, दिव्येंदू, बाबिल खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज १८ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणर आहे.