बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांचे पापाराझींवर चिडल्याचे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा चिडखोर आणि रागीट आहे, हे चाहत्यांनाही कळलं आहे. पण जया बच्चन या केवळ पापाराझींवरच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही चिडतात. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच याबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौन बनेगा करोडपती(केबीसी)मध्ये एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना याबद्दल प्रश्न विचारला. हॉटसीटवर बसलेल्या ३७ वर्षीय भूपेंद्र चौधरी यांनी अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांच्या रागीट स्वभावाबद्दल विचारलं. “जेव्हा तुम्ही जया बच्चन यांच्या फोनला उत्तर देत नाही किंवा त्यांचे ३-४ फोन येऊन जातात पण तुम्हाला ते उचलणं शक्य होत नाही, अशावेळी त्या कशाप्रकारे व्यक्त होतात?”, असा प्रश्न स्पर्धक भूपेंद्र चौधरी यांनी अमिताभ बच्चन यांना विचारला.

हेही वाचा >> “मला या मुलाबरोबर…”, श्रेयस तळपदेने सांगितला ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खानचा किस्सा

अमिताभ बच्चन यावर उत्तर देत म्हणाले, “पत्नीचा फोन उचलला नाहीतर समजायचा की तुम्ही आता गेलात. मला वाटतं माझ्याप्रमाणे सगळ्या पुरुषांची पत्नीचा फोन न उचल्यामुळे अशीच अवस्था होत असेल. माझ्याबरोबर असं तेव्हाच होतो, जेव्हा मी कामात असतो. परंतु, हे तिला(जया बच्चन) ठाऊक नसतं”.

हेही वाचा >> “बलात्कार करण्यासाठी…”, साजिद खानवर मॉडेल नम्रता सिंहचे गंभीर आरोप

“परंतु, जया यांच्या मते, जेव्हा कधी ती फोन करेल तेव्हा मी तो उचललाच पाहिजे. त्यामुळे यावर मी उपाय शोधून काढला आहे. मी आता माझ्या सेक्रेटरीला सांगून ठेवलं आहे. जेव्हा त्यांचा फोन येईल तेव्हा मी काय करत आहे हे सांगायचं. पण असं केल्यानंतर विषय आणखीनच वाढला. सेक्रेटरीने उत्तर दिल्यावर जया मला म्हणाल्या, आता तुमच्याशी बोलण्यासाठी सेक्रेटरीकडून परवानगी घ्यावी लागेल का?”, असं पुढे अमिताभ बच्चन म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 14 amitabh bachchan reveals jaya bachchan gets angry if he couldnt pick up her call kak