Kesari Chapter 2 Movie Public Review in Marathi : अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कोर्टरूम ड्रामा ‘केसरी चॅप्टर 2’ हा चित्रपट आज (१८ एप्रिलला) जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटाचं ग्रहण संपवेल, असं दिसतंय. इंडस्ट्री ट्रॅकर सकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. करण सिंह त्यागी दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित, या चित्रपटात आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही भूमिका आहेत.
‘केसरी चॅप्टर 2’ १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात अक्षयने नायर यांची भूमिका केली आहे, तर आर माधवन ब्रिटीश वकिलाच्या आणि अनन्या पांडेने दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट रघु पालट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर आधारित आहे.
‘केसरी चॅप्टर 2’ चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नेमका कसा आहे, त्याबद्दल प्रेक्षकांनी पोस्ट केल्या आहेत. ‘केसरी चॅप्टर 2’ पाहिल्यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर रिव्ह्यू केले आहेत.
पाहा पोस्ट –
Kesari Chapter 2 हा फक्त एक चित्रपट नाही, तर आपण काय गमावलं आणि आपण काय विसरता कामा नये, याची आठवण करून देणारा सिनेमा आहे, असं समीक्षक तरण आदर्श यांनी लिहिलंय. त्यांनी या चित्रपटाला ४ स्टार रेटिंग दिले आहे.
अक्षय कुमार पुन्हा एका अशा सिक्वेलसह परत आलाय, जो चित्रपट खूप उत्तम होऊ शकला असता, पण पडद्यावर तो इतका दमदार वाटत नाही. देशभक्तीपर चित्रपट असूनही त्यात इमोशनल डेप्थचा अभाव आहे, असं एका युजरने लिहिलं आहे.
‘केसरी चॅप्टर २ उत्तम चित्रपट आहे. आर माधवन, अक्षय कुमार, अनन्या पांडे यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. देशभक्तीने ओतप्रोत कोर्टरूम ड्रामा. हा चित्रपट नक्की पाहा,’ असं एका युजरने म्हटलं आहे.
प्रतिकार आणि त्यागाची एक उत्तम कहाणी. अक्षय कुमारने त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय केला आहे, माधवनने अप्रतिम काम केलंय आणि करण सिंह त्यागीचे दिग्दर्शन कमाल आहे. चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, असं एका युजरने चित्रपट पाहून लिहिलं आहे.