चित्रपट निर्माता करण जोहरने रविवारी रात्री (५ मे रोजी) त्याच्या इन्स्टाग्रामवर अचानक एका कॉमेडी शोसंबंधित निराशा व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली होती. नामांकित कॉमेडी शोचं नाव न घेता या शोचा प्रोमो पाहिल्यानंतर करणने ही पोस्ट शेअर केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करणची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या नामांकित कॉमेडी शोचं नाव आपोआप समोर आलं, ते म्हणजे- ‘मॅडनेस मचायेंगे’. आता या शोमध्ये त्याची नक्कल करणाऱ्या कलाकाराने म्हणजेच केतन सिंगने करणची माफी मागितली आहे.

केतन सिंगने मागितली करण जोहरची माफी

‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत केतन म्हणाला, “मला करण सरांची माफी मागायची आहे. सर्वप्रथम, मी जी काही नक्कल करतो त्यामागच कारण म्हणजे मी ‘कॉफी विथ करण’ हो शो खूप पाहतो, मी करण सरांच्या कामाचा खूप मोठा फॅन आहे. मी त्यांची लेटेस्ट फिल्म “रॉकी और रानी की प्रेम कहानी” किमान ५ ते ६ वेळा पाहिली आहे. जर माझ्या वागण्याने त्यांना काही त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागू इच्छितो. माझा हेतू त्यांना दुखवायचा नव्हता. मला फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं होतं, पण जर मी काही अतिरिक्त केलं असेल तर मला त्यांना सॉरी म्हणायचं आहे.”

हेही वाचा… “…पण मला याचं वाईट वाटलं”, नामांंकित कॉमेडी शोमध्ये केली करण जोहरची नक्कल; म्हणाला…

केतन पुढे म्हणाला, “करण सरांनी फक्त प्रोमो पाहिला असेल तर एपिसोड पाहिल्यानंतर मला करण सरांच्या आणि लोकांच्या प्रतिक्रिया बघायला आवडतील. मला सरांना नाराज करायचं नाही. बरेच कलाकार करण सरांची नक्कल करत नाहीत. मी काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये करण सरांची नक्कल करायचो. ‘मॅडनेस मचायेंगे’वर मी हे पहिल्यांदाच केलं. या माफिशिवाय मी सध्या काही वेगळा विचार करत नाही आहे. “

करण जोहरची पोस्ट

रविवारी ५ मे रोजी रात्री करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात करणने लिहिलं होतं, “मी माझ्या आईबरोबर बसून टिव्ही बघत होतो आणि एका प्रतिष्ठित चॅनलवर मी एका नामांकित रिअ‍ॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. त्यात एक कॉमेडी स्किट होतं ज्यात ते माझी नक्कल करत होते. त्यांनी अत्यंत वाईट नक्कल केली. ट्रोलर्स आणि निनावी लोकांकडून मी अशी अपेक्षा करू शकतो परंतु जेव्हा तुमचीच इंडस्ट्री अशा व्यक्तीचा अनादर करते जो व्यक्ती २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे, तेव्हा काळानुसार सगळ्या गोष्टी आपोआप उघड होतात. यामुळे या गोष्टीचा मला राग नाही आला पण मला याचं खूप वाईट वाटलं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kettan singh apologize karan johar for doing his mimicry in madness machayenge dvr