ओम राऊतच्या ‘रामायणा’वर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरुन सध्या वादंग सुरू आहे. अशातच नितेश तिवारींच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटाबाबतही चर्चा रंगली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री आलिया भट्ट सीता मातेच्या भूमिकेत आहे. रामायण चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘केजीएफ’ स्टारने रावणाची भूमिका साकारण्यास नकार दिल्याचंही वृत्त होतं. अखेर यावर यशने मौन सोडलं आहे. लवकरच नव्या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचं यशने सांगितलं आहे. त्याने बुधवारी(२१ जून) कुटुंबीयांसह कर्नाटक राज्यातील म्हैसून येथील कुलदैवतेचं दर्शन घेतलं. मीडिया रिपोर्टनुसार, नव्या चित्रपटाची घोषणा करण्यापूर्वी यशने कुलदैवतेचं दर्शन घेतल्याचं बोललं जात आहे. यशने यावेळी त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलही भाष्य केलं.

हेही वाचा>> Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने चुलीवर शिजवलं मटण, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “मटान शिजलं आणि…”

“देवाच्या समोर उभं राहून मी या गोष्टीवर भाष्य करू इच्छित नाही. चित्रपटातून कमावणाऱ्या पैशांना न्याय देऊ शकेल, अशाप्रकारे चित्रपट बनवला गेला पाहिजे. मी एकही मिनिट फुकट घालवत नाही आहे. मी सिनेमासाठी काम करत आहे. लवकरच याबाबत मी घोषणा करेन,” असं यश म्हणाला.

हेही वाचा>> “‘आदिपुरुष’च्या टीमला जाळलं पाहिजे”, मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “महादेवाने रावणाला…”

याबरोबरच यशने रामायण चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्याबाबतही भाष्य केलं. तो म्हणाला, “मी कुठेही गेलेलो नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका.” नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आहे.