खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, कधीच तो एकाच प्रकारच्या भूमिकेत दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता तो ‘खेल खेल में’ ( Khel Khel Mein) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला सात मित्र-मैत्रिणी आपल्या नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्यापैकी एकजण इथे आपण मित्र आहोत किंवा नवरा बायको आहोत, पण कोणाच्या मोबाइलमध्ये काय आहे, हे कोणाला माहीत आहे? असे म्हणत आहे. हे मित्र-मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचे ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले फोन हे सार्वजनिक मालमत्ता आहे, सगळ्यांनी आपापले मोबाइल सगळ्यांसमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणाच्या मोबाइलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात, कोणाच्या मोबाइलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे, असा हा खेळ आहे. आता या खेळामुळे जमलेल्यांपैकी अनेकांची रहस्ये उघड होताना दिसत असून त्यापुढे नक्की काय होणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र, या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.

chhaava movie cbfc certification vicky kaushal movie gets this cuts
‘छावा’ रिलीजसाठी अवघे ४ दिवस बाकी असताना सेन्सॉर बोर्डाची ‘या’ संवादांवर कात्री! सिनेमा किती तासांचा असेल?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Satvya Mulichi Satvi Mulgi
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कधी व कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या…
Mamta Kulkarni
सलमान-शाहरुख खानने ममता कुलकर्णीच्या तोंडावर दरवाजा केलेला बंद; म्हणाली, “गुडघ्यावर बसून ५,००० लोकांमध्ये…”
Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
tharla tar mag sayali and arjun express love for each other
ठरलं तर मग! अर्जुनने पहिल्यांदाच वाजवली बासरी, सायलीने गायलं गाणं! गुडघ्यावर बसून स्वीकारणार लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, पाहा प्रोमो
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Mamta Kulkarni Laxmi Narayan Tripathi Expelled By Kinnar Akhara Founder
ममता कुलकर्णीची एका आठवड्यात किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, महामंडलेश्वर पददेखील गेलं, नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने सोशल मीडियावर ‘खेल खेल में’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये त्यांची दोन रुपे दिसत आहेत. एका बाजूला सगळ्यांचे हसरे चेहरे दिसत असून दुसऱ्या भागात सगळ्यांनी तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपवलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाइलमधील आहे, असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे.

हेही वाचा: थाटात केलं लग्न अन् घटस्फोट न घेता वेगळा झाला पती, गर्लफ्रेंडसोबत मुंबईत पाहून अभिनेत्रीला कोसळलं रडू, म्हणाली…

‘खेल खेल में’ हा चित्रपट २०१८ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘नथिंग टू हाइड’ चित्रपटासारखा असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता.

दरम्यान, अक्षय कुमार हा नुकताच ‘सरफिरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजकेच चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. याबरोबरच, त्याच्याबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्रींचे वय त्याच्यापेक्षा अत्यंत कमी असल्यानेदेखील त्याच्यावर मोठी टीका होताना दिसते. मात्र, खिलाडी कुमार या टीकांकडे दुर्लक्ष करत सतत नवीन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.
‘खेल खेल में’ या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अपारशक्ती खुराना, जॉनी लिवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader